इथे नोकरी केल्यास मिळेल कार बोनस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : गुजरातच्या हिरा व्यापाऱ्याने सलग चौथ्या वर्षी कर्माचऱ्यांना बंपर बोनस दिला आहे. प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी बोनस म्हणून त्यांच्या सहाशे कर्मचाऱ्यांना कार आणि नऊशे कर्मचाऱ्यांना बॅंकेत एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) भेट म्हणून दिली आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट आणि बोनस देण्यासाठी त्यांनी ५० कोटी रुपये खर्च केले आहेत.

 

हरे कृष्ण एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडया कंपनीचे संस्थापक सावजी ढोलकीया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या कंपनीत सुमारे साडेपाच हजार कर्मचारी काम करतात. कंपनीची वार्षिक उलाढाल वर्षाला सहा हजार कोटी रुपये आहे. त्यांची कंपनी सुमारे ५० देशांमध्ये हिऱ्याची निर्यात करते.

 

 
 

सावजी काका या टोपण नावाने ते हिरा व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. ढोलकिया यांनी ३० कोटी रुपये खर्च करून सहाशे कर्मचाऱ्यांना मारुति सोलानो आणि रेनॉल्ट क्विड मॉडेल भेट म्हणून दिले आहे. त्यांच्या तीन व्यवस्थापकांना त्यांनी मर्सिडिज कारही दिली आहे. त्यांची किंमत प्रत्येकी एक कोटी रुपये आहे. २०१७मध्ये ढोलकिया यांनी बाराशे कर्मचाऱ्यांना कार दिल्या होत्या. दिवाळीतील बोनस म्हणून ५१ कोटी रुपये खर्च केला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@