नरेश पाटील यांची मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2018
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : न्या. नरेश पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ४ डिसेंबर रोजी मुख्य न्यायमूर्तीं मंजुला चेल्लुर सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते. मुंबई उच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ म्हणून न्या. नरेश पाटील हे प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदाचा कार्यभार सांभाळत होते. आता याच न्यायालयात त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
 

 
 

आजवर उच्च न्यायालयाच्या बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायमूर्तीपदासाठी नेमणूक केली जात असे. परंतु याला अपवाद ठरलेले न्या. नरेश पाटील हे दुसरे न्यायमूर्ती आहेत. यापूर्वी १९९४ मध्ये न्या. सुजाता मनोहर यांची अशाप्रकारे नेमणूक करण्यात आली होती. न्या. नरेश पाटील यांची मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्यात यावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज बुधवारी या शिफारसीवर शिक्कामोर्तब केले.

 
न्या. नरेश पाटील हे २०१९ च्या एप्रिलमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. सेवानिवृत्त होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी शिल्लक असल्यास आणि प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपद सांभाळत असलेल्या न्यायमूर्तींची अन्य राज्यांमधील उच्च न्यायालयांऐवजी त्याच न्यायालयात या मुख्य न्यायमूर्तीपदी निवड केली जाते. याप्रमाणे ही निवड करण्यात आल्याचे शिफारसीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@