भारतातील पहिल्या हरित महामार्गाचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2018
Total Views |

 

 
 
 
 
नितीन गडकरी यांच्या हस्ते सोहळा संपन्न
 
 

नाशिक : पर्यावरणपूरक रस्ते बांधणीतील भारतातील पहिल्या हरित महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेयाप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की, आजमितीस पर्यावरण संरक्षणासाठी सर्वच कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढे येण्याची गरज आहे. विकासकामे होताना झाडे तोडावी लागतात. मात्र कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेऊन अशाप्रकारे आपल्या सीएसआरच्या माध्यमातून वृक्षलागवडीस चालना देण्याची आवश्यकता आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संपूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे.

 
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव ते गोंदे या भागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर ६० किमीच्या पट्ट्यात हा हरित महामार्ग साकारण्यात आला आहे. या महामार्गाच्या दुतर्फा तब्बल १५ हजार वृक्ष आणि दुभाजकांवर ३० हजार वृक्षांची म्हणजेच एकूण ४५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी भाजप उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा हरितपथ संस्थेचे संचालक प्रदीप पेशकार, डॉ. प्रशांत पेशकार, अमोल जोशी यांच्यासह येस बँकचे सहकार्य लाभले आहे.

या प्रकल्पाबाबत माहिती देताना प्रदीप पेशकार म्हणाले की, नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून या महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे तोडली जातात. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या एक झाड तोडल्यास तीन झाडे लावणे बंधनकारक आहे. तसेच, त्यापेक्षा जास्त झाडे लावल्यास त्याचे स्वागत केले जाते. कंपन्यांनी आपल्या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून महामार्गांवर वृक्ष लागवड करणे अपेक्षित आहे. तसेच त्याबदल्यात या कंपन्यांना येथे आपली जाहिरात करण्याची मुभादेखील देण्यात आली आहे. या कामी मंत्रालयासमवेत कॉर्पोरेट कंपन्यांना सामंजस्य करार करण्याचे आवाहनदेखील गडकरी यांनी केले होते. त्यानुसार हरितपथ आणि येस बँक यांच्या माध्यमातून पिंपळगाव ते गोंदे या ६० किमीच्या पट्ट्यात ४५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. येस बँकेच्या येस फाऊंडेशन यांनी या झाडांच्या संगोपनकामी पालकत्व घेतले आहे. हरितपथ या संस्थेच्या माध्यमातून रस्त्याचे हरित सौंदर्यीकरण, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करण्यात येणार आहे. तसेच येथे लावण्यात आलेल्या झाडांबद्दल माहिती देताना पेशकार म्हणाले की, एकूण तीन ओळींमध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. त्यात पहिल्या ओळीमध्ये शोभेची झाडे, दुसऱ्या ओळीमध्ये सावली देणारी झाडे तर तिसऱ्या ओळीमध्ये फळझाडे लावण्यात आली आहेत. यावेळी येस बँक फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते.

 

नाशिक शहरात प्रवेश करताना नागरिकांना आल्हाददायक आणि वनसंपदेने नटलेल्या सौंदर्याचा अनुभव या माध्यमातून घेता येणार आहे. तसेच, या वृक्षांच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यासदेखील मदत होणार आहे. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील ही योजना निश्चितच परिणामकारक आणि प्रभावशाली आहे.

- प्रदीप पेशकार, भाजप उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष

तथा संचालक हरितपथ संस्था.

 
 

यांच्यात झाला सामंजस्य करार

 

येथील वृक्षलागवडीसाठी येस बँकेचे येस फाऊंडेशन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व हरितपथ संस्था यांच्यात एक वर्षापूर्वी सामंजस्य करार करण्यात आला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@