कठोर निर्णय घेणाऱ्या सरकारची देशाला गरज : अजित डोभाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : देशाला आणखी दहा वर्षे कठोर निर्णय घेणाऱ्या आणि त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारची गरज असल्याचे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केले आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) असलेल्या अजित डोभाल यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांबाबत सूचक वक्तव्य केले आहे. डोभाल म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था ७०च्या दशकात चीनपेक्षा सर्वात मोठी मानली जायची. सर्व गोष्टींमध्ये आपण चीनच्या पुढे होतो. मात्र, २०१९मध्ये चीन भारताच्या पुढे पोहोचला आहे. देशातील अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी एका स्थिर सरकारची गरज आहे.

 

त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली आहे. देशात युत्या करुन येणाऱ्या सरकारची नव्हे स्थिर सरकारची गरज असल्याचे ते म्हणाले. सरकारला देशाच्या हितासाठी काही कठोर पावले उचलावी लागतील. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही कठोर पावले उचलावी लागतील, असेही ते म्हणाले. देश हा निवडून दिलेल्या नेत्यांद्वारे नाही तर त्यांनी बनवलेल्या कायद्यांनुसार चालवला पाहिजे. देश लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभा राहील, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

ते म्हणाले, चीन सरकारने मदत केल्यामुळे अलिबाबासारखी कंपनी जगभरात विस्तारली. भारतातील खासगी कंपन्यांनी देशाच्या विकासासाठी योगदान द्यायला हवे. कच्च्या तेलाच्या वाढत्या तेलाच्या किमतींवरही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@