शिवस्मारकाच्या कार्यक्रमाला जाणा-या बोटीचा अपघात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणी बांधकामाला बुधवारपासून सुरूवात होणार होती. मात्र, यासाठी निघालेल्या बोटीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या बोटीतून सुमारे २५ जण प्रवास करत होते. त्यातील बेपत्ता असलेल्या सिद्धेश पवार याचा मृतदेह सापडला आहे. सिद्धेश त्याच्या मामासह पायाभरणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृताच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या घटनेमुळे शिवस्मारकाच्या बांधणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
 
 

 
 

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाचा आजपासून (बुधवार) शुभारंभ करण्यात येणार होता. यासाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह कंत्राटदार,शासकीय अधिकारी, काही पत्रकार आणि कर्मचारी चार स्पीड बोटींनी अरबी समुद्रामध्ये निघाले होते. परंतु, त्यांच्यातील एक स्पीड बोट खडकावर आदळून तिला अपघात झाला. सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास हा अपघात झाला. बुडत असलेल्या स्पीड बोटीतील लोकांना अन्य बोटीतील सहका-यांनी खेचून वाचविण्याचा प्रयत्न केला. सदर बोटीतील सर्वांना वाचवण्यात यश आले असल्याचे सांगण्यात आले. अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीजवळ नियोजित स्थळी शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. मात्र अपघातामुळे पायाभरणीचा शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दोन बोटींच्या मदतीने बचाव आणि शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. तसेच तटरक्षक दलाची दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच अग्निशमन दलाचे जवानही किना-यावर पोहोचले असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@