सीबीआयच्या चौकशीचा सरकारला अधिकार नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2018
Total Views |
 

नवी दिल्ली भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. पहाटेपासूनच सीबीआयने नवी दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयात छापे मारले आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यासंदर्भात नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन या चौकशीचा सरकारशी संबंध नसल्याचे म्हटले आहे.

 

देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेतील सध्याची परिस्थिती दुर्दैवी आहे. याची चौकशी करण्याचे अधिकार सरकारकडे नाहीत, केवळ केंद्रीय दक्षता आयोग या प्रकरणी चौकशी करु शकते. केंद्रीय दक्षता आयोगाला या चौकशीचे अधिकार असून दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसारच एसआयटी सीबीआय अधिकाऱ्यांची चौकशी करेल, असे जेटली म्हणाले आहेत.

 

दोन्ही अधिकाऱ्यांपैकी कोण चूक बरोबर सरकारला माहीत नाही, पण केंद्रीय दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार एसआयटी योग्यपणे चौकशी करेल, अशी माहिती जेटली यांनी यावेळी दिली. चौकशीत हस्तक्षेपावरुन विरोधकांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांचे आरोप पुर्णपणे बिनबुडाचे असल्याचे ते म्हणाले. दोन्ही अधिकारी पदावर असताना त्यांची चौकशी शक्य नसल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. अधिकारी निर्दोष सिद्ध झाल्यानंतर ते पुन्हा पदभार सांभाळतील, असे म्हणत त्यांनी विरोधकांना चोख प्रत्यूत्तर दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@