समर्थांची वाङमय निर्मिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2018
Total Views |
 

समर्थ रामदासस्वामींनी पुष्कळ वाङ्मयनिर्मिती केली. त्याची थोडक्यात माहिती घ्यायची, तर सोळा स्फुट काव्ये त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ओवीसंख्या सुमारे तीन हजार २०० इतकी भरेल. त्याशिवाय वीस दशकी ‘दासबोधा’च्या सात हजार ७५१ ओव्या आहेत. मनाचे श्लोक २०५ आहेत. ‘आत्माराम’ ग्रंथाच्या १८३ ओव्या आहेत.

 

समर्थांनी त्यांच्या जीवनक्रमात हिंदूसंस्कृती रक्षणाचे काम तर केलेच; पण हिंदवी स्वराज्याची जी मोहीम शिवरायांनी चालविलेली होती त्याला समर्थांनी ग्रंथाद्वारा तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिले. समर्थांच्या अफाट कर्तृत्वाची दखल समकालीन पंडितांनी ग्रंथबद्ध केली नाही याचा खेद वाटतो. समर्थांचा कालखंड बारकाईने पहिला, तर उत्तरेकडे मुघलांचे साम्राज्य, तर दक्षिणकडे आदिलशाही, कुतुबशाही वगैरे पाच मुसलमानी राज्ये अशा कचाट्यात महाराष्ट्र सापडला होता. समर्थांचा जन्म इ. स. १६०८ (शके १९३०) साली झाला. उत्तरेकडील मुघल साम्राज्याचा विचार करता दिल्लीची हुकमत शहाजहानकडे होती. शहाजहानचाकाल इ. स. १६२८ ते १६५७ असा आहे. त्यानंतर औरंगजेब इ. स. १९५७ ते १७०७ असा पन्नास वर्षे हुकमत गाजवत होता. शहाजहानच्या शेवटच्या काळात औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता. तो धूर्त, कपटी, अत्यंत क्रूर आणि हिंदूद्वेष्टा होता, हे इटालियन प्रवासी मनूची याने त्यांच्या प्रवासवर्णनात लिहिले आहे. हा सर्व काळ अतिशय धामधुमी होता. या ना त्या कारणाने लढाया चाललेल्या होत्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वस्थता नव्हती. या धुमश्चक्रीच्या काळात साहित्यनिर्मितीसाठी जे स्वास्थ लागते ते मिळणे अवघड होते. तरीही समर्थांनी एखाद्या घळीत राहून निसर्गसान्निध्यात साहित्यनिर्मिती केली. त्यातून त्यांनी शिष्यांना उपदेश करण्याबरोबर तत्कालीन स्थितीचे वर्णन केले आहे. दरम्यान, शिवाजीने तोरणगड किल्ला घेऊन हिंदवी स्वराज्याची पावले रोवण्यास सुरुवात केली होती.

 

समर्थ रामदासस्वामींनी पुष्कळ वाङ्मयनिर्मिती केली. त्याची थोडक्यात माहिती घ्यायची, तर सोळा स्फुट काव्ये त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ओवीसंख्या सुमारे तीन हजार २०० इतकी भरेल. त्याशिवाय वीस दशकी ‘दासबोधा’च्या सात हजार ७५१ ओव्या आहेत. मनाचे श्लोक २०५ आहेत. ‘आत्माराम’ ग्रंथाच्या १८३ ओव्या आहेत. रामायणाची दोन काण्डं समर्थांनी मराठीत लिहिली आहेत.दोन्ही काण्डांची मिळून ओवीसंख्या १४०० आहे. त्याचप्रमाणे २१ समासी जुना दासबोध, परचक्र निरुपण, अस्मानी सुलतानी, संभाजीस पत्र, करुणाष्टके, जनस्वभाव गोसावी, आनंदवनभुवनी, देवांच्या आरत्या, स्तोत्रे त्यांच्या नावावरआहेत. तसेच ‘समर्थगाथे’तील अभंग व पदे सुमारे दोन हजार आहेत. त्यातील काही पदे हिंदी भाषेत आहेत. या सार्‍या समर्थकृत वाङ्मयाचा नुसता परिचय करून घेणेही अवघड काम आहे. अर्थात, केवळ ओवीसंख्येवरून कोणाचा दर्जा ठरवता येत नाही हे खरे; परंतु, स्वामींच्या बुद्धीची वाङ्मयीन प्रतिभेची झेप विलक्षण आहे. त्यांच्या लेखनातील तत्त्वज्ञानाचा भाग, पारमार्थिक, वैचारिक भाग, प्रपंच विज्ञान हेही असाधारण आहेत. समर्थांच्या ठायी अलौकिक बुद्धिमत्ता, प्रतिभा, कल्पकता आहे. त्यांच्यापाशी ज्ञानभांडार भरपूर आहे. बारा वर्षे सर्व हिंदुस्थान पायी फिरून पहिल्याने व लोकात मिसळून कार्यक्रम साजरे केल्याने व भिक्षामिसे लोकपरीक्षा केल्यामुळे त्यांचे अनुभव विश्व दांडगे होते. दासबोध वाचताना या गोष्टी जाणवतात. एवढे असूनही हिंदूसंस्कृती धर्म रक्षणाची तळमळ, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न, सामान्यांविषयी अपार सहानुभूती, धैर्याने काम करण्याची जिद्द या चरित्र गोष्टीमुळे समर्थांचे व्यक्तिमत्व उंचावते. समर्थभक्त शंकरराव देव म्हणातात,“समर्थांचे चरित्र इतके अलौकिक आहे की, विचारांचा पल्ला आदराच्या पुढे जाऊन शकत नाही. त्यांचे सारे चरित्र अद्भुत व असामान्य आहे की, त्यांच्याजवळ जाऊन उभे राहण्याची लाज वाटते, भीती वाटते.” (समर्थवतार)

 

रामदासांच्या एकंदर साहित्यावरून हे लक्षात येते की, हिंदूसंस्कृती व धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची आवश्यकता आहे, हे त्यांना मनोमन पटले होते. समर्थ शिवकालीन प्रवृत्ती आणि राजकीय आशा-आकांक्षांशी समरस झाले होते. शिवराय आणि समर्थ रामदास ही जोडी एकाच काळात निर्माण करण्यामागे नियतीची काहीतरी योजना असावी. दोघांच्याही प्रेरणा स्वतंत्र असल्या तरी, त्या एकमेकांच्या कार्याला पूरक अशा होत्या. दोघेही स्वतंत्र विचारांचे तत्त्वज्ञ आणि क्रांतीदर्शी होते. त्यांच्या विचारांच्या परस्पर सहकार्याने महाराष्ट्राने वैभवाचे दिवस पाहिले. शिवाजीमहाराजांच्या नसानसातून हिंदवी स्वराज्याची राजकीय प्रेरणा होती. हिंदवी स्वराज्याची स्थापना हे त्यांचे ध्येय होते. तसा राजकीय वारसा त्यांच्या घराण्यातून चालत आलेला होता, तर रामदासांनी तीर्थाटनाच्या काळात देशाची अवनत लोकस्थिती, समाजस्थिती, धार्मिकता उघड्या डोळ्यांनी पाहिली होती. त्यामुळे संत प्रवृत्तीच्या स्वामींचे मत हे या काळात निवृत्तीमार्गाकडून प्रवृत्तीमार्गाकडे वळले होते.स्वामींच्याही मनात हिंदवी स्वातंत्र्याची ज्योत पेटली होती. त्यासाठी हे कार्य करू शकणार्‍या सक्षम हिंदूराजाच्या शोधात ते फिरले असतील. तीर्थाटनातील बारा वर्षांचा त्यांचा हिंदुस्थानभर झालेला पायी प्रवास सर्वांना माहीत आहे. त्यावेळी ते अनेकांना भेटले असतील. परंतु, या भेटीगाठी, बैठका अत्यंत गुप्तपणे झाल्या असतील. त्यामुळे त्यासंबंधी कागदोपत्री पुरावे शोधणे कठीण आहे. रामदासांनी भक्तिमार्ग सांगितला असला तरी, त्यांना लेचापेचा, भोळाभाबडा भक्तिमार्ग नको होता. त्यांचा भक्तिमार्ग हा ज्ञानी भक्ताचा होता. ती भक्ती हनुमानाची होती. त्या स्वरुपाचा तो भक्तिमार्ग होता. तत्कालीन पिढी त्यांना भक्तिमार्गी बलवान, स्वातंत्र्यप्रिय, धर्मनिष्ठ व स्वामीनिष्ठ अशी घडवायची होती आणि तसा प्रयत्न त्यांनी केला.

 

रामदास शिवकालीन प्रवृत्ती आणि आकाक्षांशी समरस झाले होते. याची प्रचिती त्यांच्या अस्मानी सुलतानी, परचक्र निरुपण, तुळजाभवानी स्तोत्रइत्यादी स्फुट प्रकरणातून दिसून येते. ‘परचक्र निरुपण’ या प्रकरणाचा सुरुवातीचाभाग उपलब्ध नाही. पण नंतरच्या ओव्यांतून मुसलमानांच्या धाडीचे वर्णन आढळते. संपूर्ण परचक्र निरुपण उपलब्ध झाले असते, तर तत्कालीन समाजाचे हाल समजले असते. दासबोधातील काही समासांतून प्रसंगानुरुप लोकस्थिती व समाजस्थितीचे वर्णन येते. ते वर्णन म्हणजे कविकल्पना नसून रामदासांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रसंगाचे ते वर्णन आहे. त्यातून व्यक्त झालेला भाव अंत:करणाला भिडणारा आहे. ‘आनंदवनभुवनी’ या त्यांच्या काव्यात त्यांनी पाहिलेल्या स्वप्नध्येयाचे व स्वराज्याच्या आकांक्षेचे विचार दिसून येतात. त्या काव्यात त्यांना दिसत आहे की, म्लेच्छांचा नाश होऊन हिंदुस्थान बळावला आहे. औरंग्यापापी बुडाला आहे व सर्व तीर्थक्षेत्रे मोकळी होऊन जिकडे तिकडे उदंड पाणी स्नान-संध्या करायला मिळाले आहे. हे त्यांचे ध्येयस्वप्न ते त्यांच्या ‘आनंदवनभुवनी’ काव्यात सांगत आहेत. ‘रामवरदायिनी’ या स्तोत्रात शिवाजीच्या उत्कर्षासंबंधी केलेली प्रार्थना दिसून येते. ‘तुझा तू वाढवी राजा । शीर्घ आम्हाची देखतातत्कालीन राजकीय घडामोडींबद्दल जसे रामदास जागृत असलेले दिसून येतात तसे इतर संतांच्या वाङ्मयात क्वचितच पाहायला मिळते.

 
 
-  सुरेश जाखडी
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@