पंतप्रधान आवास योजनेसाठी नवीन महामंडळाची स्थापना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |



मुंबई: आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामधील सगळ्यात मोठा निर्णय होता तो म्हणजे पंतप्रधान आवास योजनेचा. पंतप्रधान आवास योजनेमध्ये मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. घर निर्मितीला वेग देण्यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. २०२२मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतील. २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक बेघराला घरे देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी याचा फायदा होईल.

 

विदर्भ, मराठवाड्यात मत्स्यव्यवसायासाठी फिरत्या वाहनांची सोया करण्यात येणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सातत्याची दुष्काळी परिस्थिती पाहून मत्स्यव्यवसायासाठी फिरते वाहन ही योजना राबविणार आहे. मासळी विक्रीसाठी या फिरत्या वाहनाचा उपयोग करणार आहेत. राज्य सरकार आणि डीपीडीसीचा ९० टक्के, लाभार्थ्यांचा १० टक्के हिस्सा असेल. राज्यात १० जिल्ह्यांमध्ये ही योजना राबिवली जाईल. यासाठी 44 शेतकरी गटांचा सहभाग असेल.

 

पुणे वनवृत्तात वन्यप्राण्यांसाठी ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर उभारणार असल्याचे सांगितले. पुणे वनवृत्तातील मौजे बावधन, ता. मुळशी येथे २२ एकर क्षेत्रावर वन्यप्राण्यांसाठी उपचार केंद्र बांधणार आहेत. यासाठी ४७ कोटी रूपये खर्च होईल. वनविभागाकडून अन्य पायाभूत सुविधांची उपाययोजना केली जाईल. यानंतर मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणा आणखीन मजबूत करणार असल्याची माहितीही दिली. सीसीटीव्हीची संख्या वाढवणार असून ९८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच राज्यातील सुरक्षा यंत्रणेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असेही सांगण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@