शेअर बाजारात घसरण कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |


सेन्सेक्स २८७ तर निफ्टी ९८ अंशांनी घसरले

 

मुंबई : कच्च्या तेलाचे वाढते दर, रुपयाची घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढता दबाव यामुळे झालेल्या चौफेर खरेदीचा एकत्रित परिणाम मंगळवारी शेअर बाजारावर दिसून आला. त्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्स निफ्टी गेल्या सात महिन्यांच्या निचांकावर पोहोचले. सेन्सेक्स २८७ तर निफ्टी ९८ अंशांनी घसरला. एनर्जी, फार्मा, पीएसयु बॅंक, आयटी क्षेत्रातील शेअर घसरणीसह बंद झाले.

 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८७.१५ अंशांनी घसरून ३३ हजार ८४७.२३वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९८.४५ अंशांनी घसरुन १० हजार १४६ अंशांवर स्थिरावला. वित्तीय कंपन्यांची निराशाजनक कामगिरीही बाजार घसरण्यास कारणीभूत ठरली. जागतिक शेअर बाजारही घसरणीसह कामगिरी करत होते. डॉलर मजबूत झाला, युरो दोन महिन्यांच्या निचांकावर पोहोचला. रुपयाही आज १९ पैशांच्या घसरणीसह ७३.७५ बंद झाला

 

इंडियाबुल्स बॅंक, एचडीएफसी, येस बॅंक, बजाज ऑटो, पावर ग्रीड क्रॉप, कोटक महिंद्रा, अदानी पोर्ट, कोल इंडिया, एक्सिस बॅंक, टाटा स्टील, एनटीपीसी, टाटा शेअर वधारले. एशियन पेंट्स, सन फार्मा, विप्रो, टीसीएस, इन्फोसिस, एसबीआय, आयसीआयसीआय बॅंक, वेदांता, हिंदूस्थान युनिलिवर, रिलायन्स आदी शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

 

आशियायी बाजारात पडझड

जपानचा निर्देशांक निक्केई सुमारे ६०४ अंशांनी घसरला. हॉंगकॉंगचा निर्देशांक हॅंगसॅंग ८०६ अंशांनी घसरला. चीनचा निर्देशांक एसएसई कॉम्पोझिट ६० अंशांनी घसरला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@