भटक्या-विमुक्तांनी देशविघातक शक्तींपासून सावध राहावे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |
 


मुंबई : “देशामध्ये नक्षलवादाच्या रुपाने देशविघातक शक्ती फोफावत असून जातीजातींमध्ये तेढ वाढवून देशात असंतोष पसरविण्याचा नक्षल कम्युनिस्ट विचारसरणीचा डाव आहे. त्यामुळे भटक्या विमुक्तांनी देशविघातक शक्तीपासून सावध राहावे.” असे आवाहन विमुक्त, घुमंतु जनजाती विकास परिषदेचे माजी अध्यक्ष दादा इदाते यांनी केले. ते बोरिवली (पूर्व) येथे . शाहू सामाजिक केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

दादा इदाते म्हणाले की, “भटक्या-विमुक्तांनी या देशातील धर्म संस्कृतीची जतन केले आहे. स्वातंत्र्याच्या काळात हा समाज पराक्रम धर्म संस्कृतीचे रक्षण करणारा घटक म्हणून काम केले आहे.” राईनपाडा येथील भटक्या-विमुक्तांवरील हल्ला हा तेथील गावकर्‍यांनी केला नसून यामागे नक्षल लोक असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. “धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हे आदिवासी भागातील गाव असून आदिवासी माणूस असे हल्ले करत नाही,” असेही ते म्हणालेइदाते समितीच्या शिफारशींना नीति आयोगाने मान्यता दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या आयोगाचे अध्यक्ष आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच संसदेच्या लोकसभा राज्यसभा या दोन्हीही सभागृहांमध्ये भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांवर चर्चा झाली असून सामाजिक न्यायमंत्र्यांनी या समाजाच्या प्रश्नांबाबत अनुकूलता दर्शविली आहे. मी सातत्याने योग्य ठिकाणी त्याचा पाठपुरावा करीत असून येत्या आठ महिन्यांमध्ये इदाते समितीच्या शिफारसी लागू होतील,” असा विश्वास ही इदाते यांनी व्यक्त केला.

 

या देशामध्ये भटक्या-विमुक्तांची संख्या सुमारे १५ कोटी असून समाजाच्या हिताचा विचार करणार्‍या समाजात विधायक काम करणार्‍या नि:स्वार्थ संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. राज्याच्या विविध भागांत भटक्या-विमुक्त समाजातील व्यक्तीवर अन्याय होतो. त्यांची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी काही वकिलांची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले. खा. गोपाल शेट्टी यांनी समाजातील तरुण नोकर्‍यांच्या मागे लागता त्यांनी शासनाच्या कौशल्यविकास योजनेचा फायदा घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असे ते म्हणाले

 

याप्रसंगी माजी मंत्री विजय(भाई) गिरकर यांनी दादा इदाते यांनी गेल्या ४० वर्षापासून सुरु केलेल्या कामाचा उल्लेख केला. त्यांच्या प्रयत्नामुळेच डॉ. बाबासाहेबांच्या मूळ गावी केवळ चौथी पर्यंत शाळा होती. आता तेथे महाविद्यालय सुरु झाले आहे. याप्रसंगी परिषदेच्या महाराष्ट्र मुंबई पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या असल्याचे सांगितले. यामध्ये महाराष्ट्रासाठी दिलीप धोत्रे, कांचन खाडे, राजू बर्गे, देविदास भिसे, संपदा पारकर, विवेक इदाते, अनिल फड, तसेच मुंबईसाठी सहदेव रसाळ, गिरिधर साळुंके, कमलाकर कोलापटे, मंगेश शिंगे, अॅड. सोनाली गरगडे, शिवाजी भिसे, द्रुपद रावंदळे इत्यादींची नेमणूक करण्यात आल्या. याप्रसंगी मुंबईसह राज्यभरातून विविध समाजाचे सुमारे २५० प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीधर साळुंके अनिल फड यांनी केले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@