काळ्यापैशाविरोधात मोदी सरकारची कठोर पावले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : परदेशात लपवल्या जाणाऱ्या काळ्यापैशांविरोधात मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. परदेशातील काळ्या पैशांविरोधात कारवाईसाठी आयकर विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. भारतीयांच्या परदेशातील मालमत्ता आणि संपत्तीची माहिती गोळा करण्यासाठी आयकर विभागाने अनेकांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात आणखी काही माहिती हाती लागते का याबाबत चाचपणीही सुरू असल्याचे समजते.


आयकर विभागाच्या रडारवर परदेशातील संपत्ती खरेदी करून माहिती लपवणारेही आहेत. संबधितांना नोटीस बजावण्याचे काम सध्या सुरू आहे. २०१५मध्ये सरकारतर्फे काळ्यापैशाविरोधात कायदा आणला होता. या कायद्याच्या अंतर्गतच ही कारवाई सुरू आहे. बेनामी संपत्ती, बेहिशेबी मालमत्ता, करचोरी आदीं प्रकरणात दोषी आढळल्यास आरोपीला दहा वर्षे शिक्षा केली जाऊ शकतेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार येत्या काळात काळ्यापैशाविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्याकडे सरकारचा कल असणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@