गाजर नक्की कुणाला मिळाले?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |
 
 
हे गाजर देणारे सरकार आहे,” हे ठाकरे बंधूंचे आरोप मजेशीर घटनाक्रमांचे परिणाम आहेत. ते समजून घेतले की, या दोन्ही भावांची तडफड लक्षात येऊ शकते.
 

महाराष्ट्रात पूर्वी काळू-बाळूचा बहुरंगी तमाशा गाजायचा. आजच्याइतकी मनोरंजनाची साधने त्यावेळी उपलब्ध नव्हती. आजच्याइतका टीव्हीचा प्रभाव नव्हता आणि इंटरनेट तर मुळीच नव्हते. त्यामुळे काळू-बाळूचा बहुरंगी तमाशा उत्तम चालायचा. काळ सरला आणि तमाशाची कलाही मागे पडली. काळू-बाळूसारखे प्रयोगही जनमानसाच्या विस्मरणात गेले. आता मात्र त्यांचे स्मरण व्हावे, असे दोन बंधू महाराष्ट्रभर फिरून मनोरंजनाच्या कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असे दोन्ही नेते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धवजींनी जो काही गोंधळलेल्या भाषणाचा नमुना पेश केला, त्याचाच दुसरा अंक आता ते महाराष्ट्रभर फिरून सादर करीत आहेत. उद्धवजींनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. गेल्याच आठवड्यात तिथे पंतप्रधान येऊन गेले होते. आता उद्धवजींना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी नरेंद्र मोदी दिसत असल्याने त्यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांकडे काय मागितले असेल, याची जंत्रीही उद्धवजी सगळीकडे सांगत फिरत आहेत. स्वत: उद्धव ठाकरे शिर्डीत गेले, मात्र साईबाबांची श्रद्धा आणि सबुरीची शिकवण मात्र त्यांनी खुंटीवर टांगून ठेवल्याचे दिसते. मुळात आपले आमदार किती? त्यांच्या आधारावर स्वप्न काय पाहायची? सत्तेच्या वाट्यासाठी किती भांडायचे? याचे संपूर्ण तारतम्य हरविलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे उद्धव ठाकरे. आपल्या शिर्डीतल्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले,“शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे घोटाळा.” कर्जमाफीचे पैसे शिवसेनेच्या नेत्यांनी वाटले असते तर यात घोटाळाबिटाळा काहीच झाला नसता. एका बाजूला “ शेतकऱ्यांना जी कर्जमाफी मिळाली ती उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमुळेच,” असे संजय राऊत आपल्या मुखपत्रातून ओरडून सांगतात आणि दुसऱ्या बाजूलापैसे मिळालेच नाहीत, घोटाळा झाला आहे,” असे उद्धव ठाकरे जाहीर भाषणात उसने आव आणून सांगत राहतात. बेदरकार शिवसेनेच्या बेदरकार शिवसैनिकांनी इतका गोंधळलेला नेता यापूर्वी कधीच पाहिला आणि अनुभवलेला नाही. एका बाजूला सत्तेत राहण्याची अनिवार्यता आणि दुसऱ्या बाजूला स्वाभिमानाने फुगविलेली पोकळ छाती, अशी काहीशी अवस्था शिवसेनेची सध्या झाली आहे.

 

राजप्रासादातच वाढलेल्या राजपुत्राला जसे वास्तवाचे भान नसते, तशीच गत आता ठाकरे बंधूंची झाली आहे. आपण आक्रमकपणाचा आव आणला नाही तर आपल्या मागे असलेले आक्रमक शिवसैनिक आपल्या मागून भलतीकडेच निघून जातील, अशी भीती उद्धवजींना वाटत असावी. आता आपल्यामागे असे कुणीच नाही, याचे भानच त्यांना आलेले नाही. त्यामुळे जे काही घडते आहे, त्याची काहीच कल्पना त्यांना नाही. गाजराच्या शेताची जी उपमा देत त्यांनी टाळ्या मिळविल्या आहेत आणि त्याला मताचे पाणी नको, असे सांगण्याचा जो काही केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला आहे, वस्तुत: महाराष्ट्रात त्याच्या उलटच घडताना दिसत आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही मळवट बिळवट भरून शिवसेना नेते असाच टाहो फोडत होते. चिंतामण वनगांच्या मुलालाही त्यांनी फोडून नेले. मात्र, शिवसेनेचे सगळेच प्यादे उलटे पडताना दिसले. फडणवीस सरकारवर थेट टीका करता मोदींविरोधात रवरव करण्याचा जो काही एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे, त्यामुळे महाराष्ट्रात मनोरंजनाची एक मोठी लाटच उसळल्याचा भास होत आहे. ‘गाजर दिले, गाजर दिले,’ असा जो काही कांगावा सध्या सुरू आहे त्यामागे मोठे रंजक राजकारण आहे. दसरा मेळाव्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली. शिवसेनेचे कितीतरी आमदार यामुळे हुरळून गेले. प्रसंगीहाजी अराफत शेखव्हायचा म्हणून उद्धवजींनी मोठ्या कसोशीने सगळे सोडून अयोध्येलाच जायचा संकल्प जाहीर करून टाकला. राजकीय जाणकारांना हे भाषण बरोबर समजले आणि उद्धव ठाकरेंची अगतिकताही बरोब्बर लक्षात आली. आता दसरा उलटून जवळपास आठवडा झाला, तरीही मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा बार काही केल्या वाजलेला नाही. खिशातले राजीनामेवाले आसुसलेले आहेतच पण आपले कुठेतरी ताट लागेल, या आशेेने वाट पाहत बसलेले सेनेचे आमदारही आता पांगले आहेत. दसरा मेळाव्यात आक्रमक भाषण करून दुसऱ्या दिवशी मंत्री म्हणून शपथ घ्यायला धावत जाताना शिवसेना दिसली तरी हसे होणारच होते आणि आता काही तरी बालिश बोलत असल्यानेही शिवसेनेची स्थिती हास्यास्पदच झाली आहे. त्यामुळे कुणी कुणाला गाजर दिले, ते आता हळूहळू लक्षात यायला लागले आहे. फजितीनंतरचा हा कांगावा अजून काही दिवस महाराष्ट्रभर सुरू राहील.

 

धाकटे ठाकरेसुद्धा सध्या असेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. निवडणूक ते निवडणूक. मधल्या काळात काही केले तरी चालणारे ते ठाकरे आहेत. सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे लोकांकडून निवेदने स्वीकारत आहेत. बँका कुठे आहेत? घरे कुठे आहेत? हे कुठे आहे? ते कुठे आहे?, असे अनेक प्रश्न राज ठाकरेंना पडले आहेत. शिवसेना-भाजपने काय केले? नरेंद्र मोदींचा डिजिटल इंडिया कुठे आहे? वगैरे गर्दीखेचू रंजक सभांनी त्यांनीही चांगलाच माहोल तयार केला आहे. सर्वाधिक विकासकामे नाशिकमध्ये झाल्याचे ते सांगतात. आता याआधीच्या शिवसेना-भाजपच्या सत्तेत तेही वाटेकरी होते आणि उद्धव ठाकरे सतत ज्या सत्तेच्या सोन्याच्या ताटाचा उल्लेख करतात, त्यावर बसायची संधी त्यांनाही मिळाली होतीच. नाशिकचा इतका मोठा विकास झाला होता तर नाशिककरांनी मनसेला घरी का पाठविले? असाही सवाल कुणीतरी राज ठाकरेंना केलाच पाहिजे. विकासपर्यटनासाठी गुजरातला जाऊन पोहोचलेल्या राज ठाकरेंना तेव्हा भावत असलेले मोदी आता अचानक खलनायक भासू लागले आहेत. त्यामुळे कुणी कुणाला गाजर दिले, हे वेगळे सांगायला नको.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@