प्रत्यक्ष करसंकलनात १५.७ टक्क्यांनी वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : चालू वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात १५. टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरच्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याअखेर .८९ लाख कोटींचा महसूल प्रत्यक्ष करांमधून मिळाला आहे. प्रत्यक्ष कर संकलनाच्या उद्दिष्टापैकी ४२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मार्च महिन्याच्या अखेर ११. लाख कोटी कर संकलनाचे सरकारने उद्दिष्ट ठेवले आहे.

 
 
 
 

रककमेचा भरणा केल्यानंतर कर परतावा मिळणाऱ्या करदात्यांचे प्रमाण ६२ टक्क्यांनी वाढले आहे. तब्बल दोन कोटी करदात्यांना .०९ लाख कोटींचा कर परतावा देण्यात आला. चालु वर्षातप्राप्तिकर विभागाने दोन कोटी करदात्यांना परतावे दिले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी कोटी २२ लाख करदात्यांना ८३ हजार कोटींचा परतावा दिला होता. २१ ऑक्टोबर महिनाअखेर कोटी ८० लाख विवरणपत्रे प्राप्तिकर विभागाकडे सादर करण्यात आली. यंदा सव्वा कोटी नवे करदाते वाढवण्याचे उद्दिष्ट प्राप्तिकर विभागाला देण्यात आले आहे.

 

भारतात विवरणपत्र सादर करणारे एकूण कोटी २६ लाख करदाते आहेत. जानेवारी ते मार्च या तिमाहीत प्राप्तिकर खात्याने कर जनजागृतीसाठी कोटी ८५ लाख मेसेज आणि ईमेल्स पाठवले आहेत. दरम्यान, येत्या पाच वर्षात करदात्यांची संख्या दुप्पट होईल अशी शक्यता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतीच व्यक्त केली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@