राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |
 
 

मुंबई : कमी पाऊसमान आणि अन्य कारणांमुळे राज्यातील शेतकरी हवालदील असून सरकार त्याबाबत गंभीर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मंगळवारी झलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दृष्काळ सदृश परिस्थितीची घोषणा केली आहे.


 
 
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या ३१ ऑक्टोबरपूर्वी दुष्काळाबाबत आढावा घेऊन त्याबाबत आवश्यक त्या तरतुदी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. २०१८ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सर्व तालुक्यांचे महामदत संगणक प्रणालीद्वारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनानुसार राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर १’ लागू झाले होते. या तालुक्यांचे प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यांकन करून ‘ट्रिगर २’ मध्ये समाविष्ट झालेले २१ जिल्ह्यांतील १८० तालुके आज जाहीर करण्यात करण्यात आले. या तालुक्यांमधील १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त व संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. दुष्काळसदृश्य तालुक्यांमध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, विदर्भातील बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतील तालुक्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या जास्त आहे. विशेष म्हणजे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्रत्येकी १ आणि रायगडमधील ३ तालुक्यांमध्येही दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

 
 
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ७७ टक्के पाऊस पडला आहे. सुमारे तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती आहे. केंद्र सरकारचे पथक राज्यात पाहणीसाठी येणार असून त्याआधारावर राज्याला दुष्काळाची मदत जाहीर केली जाणार आहे. सध्या राज्याकडून शासनस्तरावर दुष्काळाच्या उपाययोजना सुरू केल्या जाणार आहेत. त्यामध्ये शेती निगडीत सोयी सुविधा, टॅंकर पुरवठा, गजर असेल त्या ठिकाणी चारा छावण्या, शेतीपंप विज जोडणी अखंडित वीज पुरवठा, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शाळा शुल्कात सुट जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, सर्वच चारा छावण्यांची वेळ अद्याप आलेली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र, ज्या ठिकाणी चारा छावण्यांची गरज असेल त्या ठिकाणी आतापासूनच चारा लागवड करण्याचे निर्देश प्रत्येक तालुक्यात दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकार कर्नाटकात झालेल्या उपाययोजनांपेक्षा जास्त मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. ज्या तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या ठिकाणीही उपाययोजना करणाऱ्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@