‘जलयुक्त शिवार’ विरोधकांना समजलेच नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |
 
 

मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाल्याप्रश्नी विरोधकांनी जलयुक्त शिवार योजना फोल गेल्याचा आरोप केला आहे. त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच टोला लगावला.. विरोधकांना जलयुक्त शिवार योजना समजलीच नाही. त्यांचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेवर खापर फोडले जात आहे. जलयुक्त शिवार योजनेतून राज्यात ठिकठिकाणी चांगली कामे झाली आहेत.

 

मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी जलयुक्त शिवार योजनेचा अपमान केला आहेत्यासोबत राज्यात श्रमदान करणाऱ्या प्रत्येकाचा त्यांनी अपमान केला आहे. मुळाच जलयुक्तचा अर्थच विरोधकांना कळला नाही. यादा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपासा झाला. राज्याकडे आलेल्या अहवालानुसार शेतीपंपांच्या विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. पाण्याच्या उपश्यामुळे पाण्याची पातळी घटली. सरासरी पावसाच्या ठिकाणी पाणीपातळी वाढली आहे. जलयुक्तची कामे नसती तर मोठे भीषण संकट राज्यावर आले असते.विरोधक त्यांचे नाकर्तेपण लपवण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेवर टीका करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@