पीएसआयपदांबाबात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |

 

मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीती एकूण १५४ जणांना पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. "या १५४ जणांची कोणतिही पदोनत्ती नाही. ते सरळ सेवेतून पीएसआय झाले आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीत सामावून घेत आहोत," अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
 

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की ''आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, १५४ पीएसआयना प्रशिक्षण घेतल्यानंतरही न्यायालयाच्या निर्णयामुळे रुजू करुन घेणे शक्य होत नव्हते. या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे कुठलीही पदोन्नती नाही. हे सर्वसाधारण परिक्षेतून आलेले पीएसआय आहेत. त्यांनी पूर्ण प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीमध्ये सामावून घेत आहोत," असे मुख्यमंत्री म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@