प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळेलअसे नियोजन करा - ना. रावल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |

 
 

प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळेल
असे नियोजन करा - ना. रावल
 

पाण्यासाठी तातडीने नळ पाणीपुरवठा व बंद योजना सुरू करण्याच्या सूचना
 
नंदुरबार, २२ ऑक्टोबर
नंदुरबार जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी गंभीर पाणी टंचाई व दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून टंचाई परिस्थितीवर तातडीने उपाय योजना करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज नंदुरबार व शहादा तालुक्यातील विविध गावांना भेटी देवून गांवकर्‍यांशी चर्चा करुन पिण्याचे पाणी व रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यात येतील . पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
 
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी आज जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा तालुक्यातील न्याहली, बलदाणे, भादवड, सातुर्के, अनरद, पुसनद, सावळदे, कौठळ या टंचाईग्रस्त गावांना भेटी देवून तेथील परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिकारी संजय पाटील, रोहयो उपजिल्हाधिकारी, अर्चना पठारे, अधिक्षक कृषि अधिकारी बी.एन. पाटील विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता सोनुले, कार्यकारी अभियंता व्ही.बी. जगताप, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता, भांडेकर, कार्यकारी अभियंता डी.डी. जोशी, तहसिलदार नितीन पाटील, गट विकास अधिकारी पटाईत उपस्थित होते.
 
 
ना. जयकुमार रावल म्हणाले की, जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे. नंदुरबार व शहादा तालुक्यातील विविध गावांना भेटी देत पिकांची पाहणी केली, शासन शेतकर्‍यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातील. जुलै, २०१९ पर्यंत पुरेल असे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, प्रत्येक व्यक्तीला रोजगार हमी योजनेतून रोजगार मिळावा यासाठी ग्रामपंचायतींने तीन कामे शेल्फवर ठेवावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मंत्रालयस्तरावरुन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपला प्रयत्न राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक मंत्री व लोकप्रतिनिधींना दिलेल्या आदेशानुसार जिथे जिथे शेतकरी अडचणीत आहेत तेथे जावून लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी मदत करावी. शेतक-यासाठी जे जे करता येईल ते तातडीने करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
पालकमंत्री जयकुमार रावल पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बोंडअळीचा तिसरा हप्ता ३० कोटी रुपये मिळवून देण्यासाठी आपण सबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधलाअसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात पिण्याच्या पाणी व रोजगारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही गरज भासल्यास जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ज्या गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता प्रशासनाने तातडीने टॅकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशा सूचना देवून तांत्रिक मान्यता तातडीने दिल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार डॉ. विजयकुमार गावीत व जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नंदुरबार व शहादा तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवून शेतकर्‍यांच्या शेतावर व ग्रामपंचायतींमध्ये अडचणी ऐकून तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. गरज भासल्यास पुढच्या आठवड्यात पुन्हा दौरा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@