नफेखोरीमुळे शेअर बाजार घसरला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2018
Total Views |
 

मुंबई : सुरुवातीला दमदार कामगीरी करणारे निफ्टी सेन्सेक्स दिवसअखेर घसरणीसह बंद झाले. बाजार बंद होण्यापूर्वी दिवसभरातील सर्व तेजी निघून गेली. बॅंकींग आणि वित्तीय क्षेत्रातील शेअरमध्ये जोरदार नफावसुली झाल्याने बाजार घसरला. उर्जा आणि धातू क्षेत्रातील शेअरमध्येही घसरण नोंदवण्यात आली.

 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दिवसअखेर १८१ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार १३४ अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५८ अंशांनी घसरुन १० हजार २४५ च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी बॅंक इंडेक्समधील सात शेअरमध्ये कमालीची घसरण नोंदवण्यात आली.

 
भारत पेट्रोलियम, अल्ट्राटेक सिंमेट, रिलायन्स, एशिएन पेंट्स, कोटक महिंद्रा बॅंक, इंडियन ऑईल, हिंदूस्तान पेट्रोलियम आणि ओएनजीसी आदी शेअर अडीच ते पाच टक्क्यांनी घसरले. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या शेअरमध्ये टक्के वाढ नोंदवण्यात आलीआयसीआयसीआय बॅंक, आयशर मोटार, एनटीपीसी, बजाज ऑटो, एचसीएल टेक्नोलॉजी, एचडीएफसी बॅंक, अदानी, मारुति सुझूकी आणि हीरो मोटोकॉप आदी शेअरमध्ये मजबूती दिसून आली
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@