खड्डे पडणार नाही असे रस्ते बनवणार - चंद्रकांत पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2018
Total Views |



कल्याण: येत्या २ वर्षांत महाराष्ट्रातील रस्त्यांचे काम करण्यात येणार असून या माध्यमातून १० वर्षात त्यावर खड्डे पडू नये याची खबरदारी घेण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कल्याण-पडघा मार्गावर असणाऱ्या मुठवळ गावात हावरे बिल्डर्सच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यासाठी ते आले होते. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाला खासदार कपील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

आपण या ठिकाणी येणार होतो. त्यामुळे शासकीय यंत्रणा कामाला लागली आणि ८ दिवसात याठिकाणी नवा रस्ता तयार झाला. परंतु येत्या २ वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही असे रस्ते बांधत आहोत ज्यावर १०-१० वर्षांत एकही खड्डा पडणार नाही असे पाटील म्हणाले. नॅशनल हायवेवरील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करीत आहोत, महाराष्ट्रातील स्टेट हायवेचे रस्तेही ३ पदरी नॅशनल हायवेच्या तोडीचे होत आहेत तर ग्रामीण भागामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते होत असून तेदेखील नॅशनल आणि स्टेट हायवेच्या दर्जाचे बनवत आहोत. या रस्त्यांच्या कामाची ५ किंवा १० वर्षाची डिफेक्ट लायबेलिटी निश्चित करण्यात येत असून या कालावधीत रस्त्यावर खड्डा पडल्यास संबंधित कंत्राटदाराने तो भरायचा आहे. २०२२ पर्यंत सर्वत्र अशा रस्त्यांचे जाळे विणले जाणार असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केले.

 

तसेच सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डॉ. सुरेश हावरे, अमित हावरे आणि अमर हावरे यांच्या कामाचेही कौतुक केले. मुठवळ येथील प्रकल्पात घरं घेतलेल्या निवडक लोकांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@