पाचव्या दिवशीही पेट्रोल डिझेलचे दर घसरले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2018
Total Views |
 

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावांमध्ये सातत्याने घट होत आहेमुंबईत पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३८ पैशांनी स्वस्त झाले आहेत्यामुळे मुंबईत पेट्रोल ८६.९१ रुपये तर डिझेल ७८.५१ रुपये इतके स्वस्त झाले आहेगेल्या आठवड्यात इंधनदरात सलग पाचव्यांदा घट नोंदवण्यात आली आहेत्यामुळे सामान्यांनाही दिलासा मिळाला आहे.

 

मुंबईसह दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता आदी भागांतील पेट्रोल डिझेलचे दर घसरले आहेत. चेन्नईत पेट्रोल ८२.६४ रुपये तर डिझेल ७९.२२ रुपये, दिल्लीत पेट्रोल ८१.४४ रुपये तर डिझेल ७४.७९ रुपये, कोलकत्त्यात पेट्रोल ८३.२९ रुपये डिझेल ७६.७७ रुपयांवर घसरले आहे. १८ ऑक्टोबरपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे.

 
दरम्यान पेट्रोलच्या किमती ९० रुपयांवर पोहोचल्यावर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत शुल्कात अडीच रुपयांनी कपात केली होती, तर पेट्रोल कंपन्यांनी एक रुपया आणि राज्यांनीही त्यांचे अडीच रुपयांनी शुल्क कमी केले होते, त्यामुळे पेट्रोलच्या दरात पाच रुपयांनी घट झाली होती, त्यानंतर डिझेलवरील शुल्क कमी केल्याने डिझेल चार रुपयांनी स्वस्त झाले होती. दरवाढ सुरूच असल्याने दहा दिवसातच दर पूर्वपदावर आले. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी पेट्रोलचे दर स्थिर राहिले होते, त्यानंतर सलग पाच दिवस ही घट नोंदवण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@