अहमदनगरमध्ये भीषण अपघातात आठ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2018
Total Views |
 

 

अहमदनगर : अहमदनगर-पुणे मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. यात आठ जण जागीच ठार झाले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एक खासगी बसने रस्त्यावरील ट्रकला धडक दिली. 

बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या धडकेत बस उलटली. अपघातात चालकाच्या बस केबिनच्या भागाचा चुराडा झाला. पारनेर तालुक्यात वाडेगव्हाण फाटा येथे सोमवारी पहाटे .३० वाजता हा अपघात घडला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली आहे.

अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी जखमींना शिरुर आणि पुण्यातील रुग्णालयात हलवले आहे. या घटनेनंतर अहमदनगर-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूककोंडीमुळे रस्त्यावर उलटलेला ट्रक बाजूला काढण्यासाठी क्रेन घटनास्थळी पोहोचण्यास अडचण येत होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@