मल्ल्याची लंडनमधील हवेली होणार जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
नाओमी केंटन : भारतीय बँकांचे कोट्यावधींचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याची लंडन येथील आलिशान हवेली लवकरच जप्त होणार आहे. या हवेलीतून मल्ल्या कुटुंबियांना बाहेर काढण्यासाठी स्विस बँकेने कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे विजय मल्ल्या आता परदेशात बेघर होणार असल्याचे कळते.
 

नाओमी केंटन येथे रेजेन्ट पार्कमध्ये विजय मल्ल्याच्या मालकीची आलिशान हवेली आहे. या हवेलीमध्ये विजय मल्ल्या आपली आई आणि मुलगा सिद्धार्थ मल्ल्या यांच्यासोबत राहत आहे. ही हवेली गहाण ठेवून विजय मल्ल्याने स्विस बँक यूबीएसकडून १९५ कोटींचे कर्ज घेतले होते. मुदतीअखेर विजय मल्ल्याने कर्ज न फेडल्याने ही हवेली जप्त करण्यात येणार आहे. यासाठी यूबीएस एजीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर न्यायालयात २४ ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल. मल्ल्या व त्याच्या कुटंबियांना यूबीएसने हवेली सोडून जाण्यास सांगितले होते. परंतु मल्ल्या कुटुंबाने ही हवेली सोडण्यास नकार दिला आहे. अशी माहिती यूबीएसने दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@