आठवडा पाच दिवसांचा करा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2018
Total Views |


 


मुंबईः केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिका़ऱ्यांनाही शासकीय कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर निवेदनही देण्यात आले आहे. राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवसांची सुट्टी मिळाल्यास त्यांची कार्यक्षमता अधिक वाढेल शिवाय एक दिवस घरातील कामकाजासाठी आणि दुसरा दिवस स्वत:साठी देणे सरकारी कर्मचाऱ्यांना शक्य होईल, असे अधिकारी महासंघाचे म्हणणे आहे. तर, कामकाजाची वेळ अशी केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात. त्यानुसार महाराष्ट्रात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळही तीच करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या या निवेदनात करण्यात आली आहे. जर ५ दिवसांचा आठवडा लागू झाला तर सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ किंवा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.०० अशी शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळ होऊ शकते.

 

अधिक तास भरुन देणार

 

सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या अहवालात आता ५ दिवसांच्या आठवड्याची शिफारस आहे. १९८८ पासून राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मिळते. आता केंद्राप्रमाणे राज्यात ५ दिवसांचा आठवडा लागू झाल्यास शासकीय कामकाजाच्या निकषाप्रमाणे अधिक तास भरून देण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी दर्शवली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली आहे. तसेच ही मागणी मान्य करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@