बंदरे आणि रस्तेविकासासाठी ७ लाख कोटी मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2018
Total Views |



मुंबई: "राज्यातील बंदरे आणि रस्ते विकास कामांसाठी ७ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ५ लाख कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली असून उर्वरित निधी रस्ते विकासासाठी देण्यात येणार आहे." अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बंदर विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते नव्याने बांधलेल्या आंतरदेशीय क्रूझ टर्मिनलच्या उद्घाटन समारंभामध्ये बोलत होते. मुंबई पोर्ट ट्रस्टने भाऊचा धक्का परिसरात बांधलेल्या आंतरदेशीय क्रूझ टर्मिनलचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. मुंबई ते गोवा जलमार्गावर सागरी पर्यटनाचा आनंद देणाऱ्या देशातील पहिल्या आंतरदेशीय ‘आंग्रीया’ क्रूझला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

 

पर्यटनाच्या दृष्टीने एक नवे पाऊल उचलले आहे. आंतरदेशीय क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने भाऊचा धक्का परिसरात आंतरदेशीय क्रूझ टर्मिनल उभारण्यात आले आहे. या टर्मिनलमधून पर्यटकांना आंतरदेशीय क्रूझ पर्यटनाचा सुखकर प्रवास घडविण्याचा पहिला मान ‘आंग्रीया’ क्रूझला मिळाला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि इतर नेते उपस्थित होते.

 

सागरमालाअंतर्गत राज्यात ११५ प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बंदरांच्या विकासासाठी २.३५ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केले. रस्ते विकासासाठी ४.५ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामधील ३.४ लाख कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली आहे. तर आंतरदेशीय क्रूझ टर्मिनलच्या ठिकाणी ३ एमएलडी क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र प्रस्तावित असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@