अनधिकृत बांधकामे उभारणे भोवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2018
Total Views |



मुंबई: अंधेरी पश्चिम परिसरातील विविध उपहारगृहांमधील अनधिकृत बांधकामांवर तोडकाम कारवाई सुरू असून आतापर्यंत नऊ उपहारगृहांमधील एकूण १५ हजार चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकाम तोडण्यात आले आहे. यामध्ये इनडिपेंडट ब्रेवरीज, स्पेस बार, लिटल डोअर, कॅलिडो, ब्र्युबॉट, ऑटम, ग्लोकल जंक्शन, बी देसी, बियॉण्ड बार या उपहारगृहांचा समावेश आहे, तर कारवाई अंतिम टप्प्यात असलेल्या दोन उपहारगृहांमध्ये राईक टेरेस बार व बार्बेक्यू नेशन यांचा समावेश आहे. ‘परिमंडळ- ४’चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान प्रामुख्याने अपेक्षित असणार्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली विविध प्रकारची बांधकामे तोडण्यात आली आहेत, अशी माहिती ‘के पश्चिम’ विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

 

महापालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागांतर्गत जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशीवरा, वर्सोवा व वर्सोवा समुद्र किनारा इत्यादी परिसरांचा समावेश होतो. याच ‘के पश्चिम’ विभागातील विविध उपहारगृहांमधील मोकळ्या जागेतील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. मुंबई पोलीस दलाच्या विशेष सहकार्याने महापालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाद्वारे करण्यात येत असलेल्या या कारवाई करिता २५ पोलिसांचा ताफा संबंधित घटनास्थळी तैनात असून या कारवाईत महापालिकेचे २० कामगार, कर्मचारी आणि अधिकारीदेखील सहभागी झाले आहेत. या कारवाईसाठी एक जेसीबी, दोन लॉरी वाहने, गॅस कटर, हातोडे, घण व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात येत असून अनधिकृत बांधकामांवरील ही धडक कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे, अशीही माहिती साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@