गरजेच्या वेळी रयत शिक्षण संस्थेला रामशेठ ठाकूर यांची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2018
Total Views |



पनवेल: “ ‘रयत’ला भरभरून देणारे ‘रयत’चे माजी विद्यार्थी आणि माजी खा. रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली. जेव्हा जेव्हा रयत शिक्षण संस्थेला पैशांची गरज पडली त्यावेळी ठाकूर यांनी मदत केली. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मौलिक आणि महत्त्वपूर्ण आहे,” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण-कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून केंद्र सरकार नीति आयोगाच्या ‘अटल टिकरिंग’ प्रयोग शाळेचे उद्घाटन आणि माजी विद्यार्थी सत्कार सोहळा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी पाटील बोलत होते.

 

डॉ. पाटील यांनी यावेळी म्हणाले की, “कर्मवीर अण्णांनी ही शिक्षण संस्था सुरू केली. अनेक हितचिंतकांच्या पाठिंब्यामुळे ही संस्था मोठी झाली आहे. अण्णांनी १०० वर्षांपूर्वी सीएसआरची मागणी केली होती ती आज १०० वर्षांनंतर पूर्ण झाली. जर सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे मानवी जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे,” असेही डॉ. पाटील म्हणाले. आज या संस्थेकडे ३५ बालवाड्या, ५१ माध्यमिक शाळा, ४३८ उच्च माध्यमिक शाळा, ४२ महाविद्यालये, ३६४ कनिष्ठ महाविद्यालये, ६० डी.एड. महाविद्यालये, १० हॉस्टेल शाळा, ९१ वसतिगृहे आणि ६० लाख ५८ हजार मुले शिकत असलेली ही एकमेव संस्था आहे. या संस्थेसाठी अण्णांनी आपला पगार, आई-वडिलांचे इन्श्युरन्स, पत्नीचे दागिनेदेखील दिले.

 

सर्व पक्षाची, जातीची, धर्माची, माणसे एकत्रित काम करीत असलेली ही संस्था आहे. ‘अटल टिकरिंग’ ही २० लाखांची प्रयोगशाळा आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात २२ हजार शाळांमधून फक्त १०० शाळांना ही प्रयोगशाळा देण्यात आल्या असून यातील २१ शाळा या ‘रयत’च्या आहेत. ‘रयत’ ही केवळ संस्था नाही, तर ‘रयत’ ही आपली माऊली आहे,” असे सांगत गव्हाण येथील विद्यालयात जागतिक दर्जाचे शिक्षण शंभर टक्के मिळेल, असा विश्वासही डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@