जळगाव ‘तरुण भारत’ची उपक्रमशीलता अखंडित राहावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018
Total Views |

भुसावळ विभागीय कार्यालय शुभारंभप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार


 
https://www.facebook.com/Tarunbharatjal/

भुसावळ, १ ऑक्टोबर
‘तरुण भारत’ने आजवर विविध उपक्रम राबविले आहेत. या वृत्तपत्राची ही उपक्रमशीलता भविष्यातही अशीच कायम राहावी आणि ‘तरुण भारत’ने जनमाणसांशी जोडलेले नाते उत्तरोत्तर वाढत राहावे, अशी अपेक्षा राज्याचे अर्थ आणि वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भुसावळ विभागीय कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केली.
 
 
जळगाव ‘तरुण भारत’च्या भुसावळ विभागीय कार्यालयाचा शुभारंभ सोमवार, १ ऑक्टोबर रोजी ब्राह्मण संघाजवळील आयडीबीआय बँकेच्या वर (दुसरा मजला) येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
प्रारंभी ‘तरुण भारत’च्या विविध उपक्रमांविषयी ना. मुनगंटीवार यांनी माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव स्वप्निल चौधरी यांच्याकडून माहिती जाणून घेतली. ‘तरुण भारत’ने आजवरच्या वाटचालीत समाज प्रबोधनासह राष्ट्रनिर्मितीचे कार्यही प्रभावीपणे केले आहे, असेही ते म्हणाले.
 
 
यावेळी माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे सचिव रत्नाकर पाटील, भुसावळ विभागीय सल्लागार संचालक समकित सुराणा यांनी ना. सुधीर मुनगंटीवार आणि जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांचे ‘तरुण भारत’ परिवारातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा यांनी केले.
 
 
याप्रसंगी भुसावळचे आ. संजय सावकारे, आ. चंदूभाई पटेल, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुडकर, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी उपनगराध्यक्ष अनिल चौधरी, नगरसेवक प्रमोद नेमाडे, मुकेश पाटील, ऍड.बोधराज चौधरी, पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, दिनेश राठी, किरण कोलते, बापू महाजन, निक्की बत्रा, राजेंद्र नाटकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, गिरीश महाजन, वरुण इंगळे, भाजपा ओबीसी प्रदेश महामंत्री अजय भोळे, अनिल रामचंद्र चौधरी, भाजप महिला जिल्हाध्यक्षा शैलजा पाटील, रिपाइं उत्तर महाराष्ट्र प्रमुख रमेश मकासरे, बांधकाम व्यावसायिक श्रीराम खटोड, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नीता कटलर, सविता सहजे, रिपाइं ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, प्रकाश निकम, व्यावसायिक कृष्णा भोळे,राधेशाम लाहोटी, हरीश मुंदडा, शैलेश राठोड, भूपेंद्र शर्मा, मनू जजवाणी, विकास पाचपांडे, राजेश सुराणा, अक्षय चोरडिया, शुभम ललवाणी, मोंटू अग्रवाल, राजेश लढ्ढा, नरेंद्र लढ्ढा, गोविंद हेडा, नरेंद्र अग्रवाल, नगीन कोटेचा, सतीश अग्रवाल, नितेश चिप्पड, सुरेश मुंडकर, गोविंद अग्रवाल, राजेश काकानी, पूजा ऍड एजन्सीचे विशाल अग्रवाल, शुभम सरकार, गोपाळ शर्मा, लन शर्मा, बंडू बिडकर, कमलाकर साळुंके तसेच पत्रकार उत्तम काळे, गोपाळ रोकडे, मोना वाघमारे, शेख सत्तार, प्रेम परदेशी, किशोर शिंपी, उदय जोशी, अभिजीत आढाव यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तोमर यांनी प्रत्यक्ष येऊन तर उद्योजक मनोज बियाणी तसेच डॉ. राजेश मानवतकर यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. या मान्यवरांसोबतच ‘तरुण भारत’चे वार्ताहर, स्नेहीजन आणि मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच केशवस्मृती सेवासंस्था समूहातील विविध प्रकल्पांचे प्रमुखही आवर्जून उपस्थित होते.
सर्वस्तरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा ओघ
 
https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
@@AUTHORINFO_V1@@