महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोरच राष्ट्रवादीचे पदाधिकारी भिडले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018
Total Views |



डोंबिवली: देशाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर त्यांच्या जयंतीदिनीच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपसात भिडले. डोंबिवलीत घडलेल्या या घटनेची कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. कल्याण-डोंबिवलीत आधीच राष्ट्रवादीला घरघर लागली असताना या घटनेवर वरिष्ठ नेते या पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करतील, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

 

महात्मा गांधी जयंतीदिनी डोंबिवली पश्चिमेकडील पु. भा. भावे सभागृहासमोर महात्मा गांधी उद्यानात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर धरणे आंदोलन करण्यासाठी पदाधिकारी एकत्र आले होते. मात्र त्यावेळी आपला फोटो झळकावा म्हणून सर्वात पुढे कोण बसणार, यावर माजी जिल्हा कार्याध्यक्ष विलास म्हात्रे आणि माजी शहर कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. प्रोटोकॉलनुसार कोण पुढे बसणार यावरून सुरू झालेल्या वादात दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. याबाबत जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@