होमियोपॅथीची मूलभूत तत्त्वेऔषध सिद्धता - ( भाग-५)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
औषध सिद्धतेच्या प्रक्रियेबद्दल आपण विस्ताराने जाणून घेत आहोत. आजच्या भागात आपण औषध सिद्धतेचा एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे, लक्षणाची व चिन्हांची व्यवस्थितरीत्या नोंदणी करणे.
 

औषध सिद्धतेच्या प्रक्रियेत खालील प्रकारची लक्षणे नोंदवली जातात.

 
१) सर्व औषधांची शरीरावर होणारी प्रक्रिया व त्यातून दिसू लागलेली लक्षणे यांची नोंद केली जाते. सर्व औषधांच्या प्राथमिक क्रियेची (primary action of a drug) लक्षणे घेतली जातात. फक्त मादक पदार्थाचे गुणधर्म तपासताना असे केले जात नाही.
 

) काही मादक द्रव्यांचेदेखील औषधी गुणधर्म तपासले जातात. परंतु, या मादक द्रव्यांच्या प्राथमिक क्रियेची लक्षणे गृहित धरत नाहीत, तर शरीरातील चैतन्यशक्तीने प्रतिक्रिया म्हणून दाखवलेली (secondary action) लक्षणे नमूद केली जातात.

 
३) काही औषधांनी दाखवलेली वैकल्पिक क्रियेची (alternating options) अचानकपणे उद्भवणारी लक्षणे व चिन्हे नमूद करून ठेवली जातात.
 

) शरीरातील लक्षणांना वाढवणाऱ्या वा कमी करणाऱ्या अशा काही क्रिया, चिन्हे वा लक्षणे औषध सिद्धते दरम्यान दिसली, तर ती फारच महत्त्वाची असते. कारण, ही लक्षणे वा चिन्हे पूर्णपणे वैयक्तिक असतात व आजाराची नसतात.

 

) शरीराच्या व मनाच्या सामान्य क्रियांव्यतिरिक्त जराही कुठला बदल शरीरात व मनात जाणवला, तर तो साध्या सरळ भाषेत व खराखरा लिहून ठेवला जातो. एखादे लक्षण लवकर किंवा उशिरा दिसू शकते. त्यामुळे सामान्य शारीरिक क्रियेव्यतिरिक्त होणारे सूक्ष्म बदलसुद्धा नमूद केले जातात.

 

लक्षणे नोंदवण्याची पद्धत

 

) शिक्षित सिद्धकर्ता : जर सिद्धकर्ता शिक्षित असेल, तर त्याने सर्व लक्षणे, चिन्हे, शरीरात व मनात होणारे बदल, संवेदना, लक्षणे येण्याची वेळ, लक्षणे वाढण्यासाठी व कमी होण्यासाठी होणारे बदल हे सर्व लिहून ठेवावेतया सर्व बदलांच्या नोंदी मग मुख्य सिद्धकर्ता जो स्वत: होमियोपॅथीक डॉक्टर असतो, त्यांच्याकडे सोपविल्या जातात. हा प्रमुख सिद्धकर्ता मग या विविध सिद्धकर्त्यांकडून आलेल्या लक्षणांची व चिन्हांची व्यवस्थित नोंद ठेवतो व जर हा सिद्धतेचा प्रयोग बरेच दिवस चालणारा असल्यास रोजच्या रोज सर्व लक्षणे व चिन्हे नोंदवून घेतो.

 

२) अशिक्षित सिद्धकर्ता : जर सिद्धकर्ता हा अशिक्षित असेल, तर त्याने रोजच्या रोज त्याच्या शरीरात व मनात होणारे बदल व संवेदना डॉक्टरांकडे जे मुख्य सिद्धकर्ता असतात, त्यांच्याकडे येऊन सांगावीत व डॉक्टरांनी पण कुठलेही दर्शक प्रश्न किंवा थेट प्रश्न विचारू नयेत. जसे व जे लक्षण आहे, ते तसेच्या तसे उतरवून घ्यावे. या औषध सिद्धतेच्या प्रयोगामध्ये एक शंका येणे स्वाभाविक आहे की, जर होमियोपॅथीचे औषध निरोगी माणसांवर सिद्ध केले तर त्या माणसांना काही त्रास तर होत नाही ना? किंवा औषधांमुळे काही गंभीर आजार तर होत नाहीत ना? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. याचे कारण असे की, होमियोपॅथीची औषधे सिद्ध करताना अतिशय सूक्ष्म मात्रेत माणसांना दिली जातात. या सूक्ष्म मात्रेमुळे शरीरातील पेशींवर वाईट परिणाम होत नाही. माणसांना लक्षणे जरूर दिसू लागतात. परंतु, ती लक्षणे व चिन्हे ही functional पातळीवर असतात शरीराची रचना (structure) त्याने बदलत नाही. शिवाय प्रत्येक आजारामध्ये पेशींमध्ये बदल होण्याच्या आधी जी लक्षणे दिसू लागतात, ती सर्व लक्षणे समजून आल्यामुळे त्या पेशीबदलांवरही ही औषधे गुणकारक ठरतात. त्यातूनही जर एखाद्या माणसाला शरीरातील पेशींमध्ये रोगकारक बदल जाणवू लागले, तर मग मुख्य सिद्धकर्ता लगेचच ते औषध antidote करतो. म्हणजेच त्यांच्यावर उतारा दिला जातो. त्यामुळे माणसाला काहीही हानी होत नाही व हे औषध सिद्धतेचे प्रयोग हे अतिशय सुरक्षित असतात.

 
- डॉ.मंदार पाटकर 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@