निर्यातक्षम उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018
Total Views |


 

भारतासारख्या विकसनशील देशाला प्रगतीची शिखरे गाठावयाची असल्यास नागरीकानी निरोगी जीवनमान व्यतीत करणे आवश्यक आहे. जन्मदर वाढल्यास आणि मृत्यू दर घटल्यास नागरिक आरोग्यदाई जीवनमान व्यतीत करत आहे. असे म्हटले जाते. राष्ट्राची हीच गरज ओळखून आणि राष्ट्रातील नागरिकांना निरोगी निरामय जीवन व्यतीत करता यावे. आणि रुग्णांना आराम मिळेल असे औषोधपचार सहज उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून शहा कुटुंबीयांनी अनुह फार्म ली. या औषधनिर्माण कंपनीची स्थापना केली. आजमितीस या कंपनीस ८५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

 

उद्योजकाचे संपूर्ण नाव : बिपीन नेमचंद शहा (व्यवस्थापकीय संचालक)

कंपनीचे नाव : अनुह फार्म लिमिटेड

कंपनीचे उत्पादन : औषधांचे उत्पादन व वितरण

व्यावसायिक क्षेत्र : देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय

कर्मचारी संख्या : १२००

वार्षिक उलाढाल : ३०० कोटी

प्रेरणास्रोत : आजोबा (खेमचंद सी. शहा)

भविष्यातील लक्ष्य : उत्तम औषधांची निर्मिती करणे

 

सध्या या कंपनीची यशस्वी धुरा व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन शहा मोठ्या निष्ठेने सांभाळत आहे. त्यांना एकूण दोन मुले आहेत. रीतेष व विवेक त्यातील रितेश यांनी अमेरिकेतून व्यवस्थापन शास्त्राचे पदुत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. तर, विवेक यांनी सूक्ष्मजीव तंत्र शास्त्रात (बायोटेकनोलोजी) या विषयात मुंबई विद्यापीठातून पदुत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. दोन्ही मुलांच्या आधुनिक दृष्टिकोनाचा शहा यांना आपल्या व्यवसायात मोठा फायदा होतो. काळानुसार बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करण्यची अभिलाषा शहा यांच्या ठायी सदैव दिसून येते. तसेच, पिढीबदलातील दृष्टीकोनाकडे बिपीन शहा कायमच सकारत्मकरित्या पाहत असल्याने त्यांच्या व्यवसायाची भरभराट होण्यास मदत झाली आहे. बिपीन शहा यांच्या गृहिणी असलेल्या पत्नी सौ. भारती शहा यांचे पाठबळ बिपीन यांच्यासाठी नेहमीच मोलाचे ठरले आहे. कार्य व्यस्ततेमधून काही प्रफुल्लीत क्षण व्यतीत करता यावे यासाठी शहा आपल्या दोन नाती मध्ये रममाण होताना दिसतात. शहा यांना मुळातच आपल्या या कौटुंबिक व्यवसायत रस होता. त्यामुळे त्यांनी बडोदा येथून १९७२ साली आपले रसायन अभियांत्रिकी मधील शिक्षण पूर्ण केल्यावर या आपल्या कौटुंबिक व्यवसायात स्वतःला झोकून दिले. शहा यांच्या मते आजही आणि यापुढेहि या व्यवसायात व्यक्तिला प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कष्ट, सातत्य आणि निश्चित ध्येय या त्रिसूत्रीवर मानवाची प्रगती अवलंबून असते. असे शहा आवर्जून नमूद करता. त्यासाठी ते स्वतःचे उदाहरण देता. त्यांनी इयत्ता दहावी मध्ये असतानाच आपले क्षेत्र निवडले होते. व त्याच प्रमाणे त्यांनी रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. जर, आपल्याला जीवनात काय करवयाचे आहे हे आपण ठरविले आणि ते साध्य करण्यासाठी नेमकी काय साधन वापरायचे हे ठरविले व त्याची नित्य नियमाने साधना केली तर यश दूर नाही. या शब्दात शहा आपल्या यशाचे गमक सांगतात.

 

आजच्या युवकांनी चौकटी बाहेरचा विचार करावा. तसेच केवळ पदवी हेच अंतिम शिक्षण न ठेवता आपल्या आवडीच्या शिक्षणाचे सर्वोत्तम टोक आपण गाठावे. तसेच ज्यांना औषधनिर्माण क्षेत्रात कार्य करावयाचे आहे, त्यांच्यासाठी येथे भरपूर संधी आहेत.”

 

सुरुवातीच्या काळात बिपीन शहा यांनी त्यांच्याच कुटुंबाची कंपनी असलेल्या एसके फरीन केमिकल्स या कंपनीत नौकरी करण्यास प्रारंभ केला. या कंपनीत त्यांनी १७ वर्ष अविरत सेवा बजावली . व त्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये अनुह फार्मा ली. या कंपनीची स्थापना केली. रोगप्रतीजैवक यांची निर्मिती करणे व त्यांचे वितरण करणे हे या कंपनीचे कार्यक्षेत्र आहे. सुवातीच्या काळात मात्र आठ कर्मचार्‍यांसह स्थापन झालेल्या या कंपनीत आजमितीस बाराशे कर्मचारी कार्यरत आहे. तसेच या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे तिनशे कोटी इतकी आहे. त्यामुळे स्वतः बरोबरच इतरांच्या प्रगतीला हातभार लावणारे बिपीन शहा एक संपत्ती निर्मातक ठरत आहेत यात शंका नाही. सुरवातीच्या काळात दीड टन/प्रतिवर्ष इतका असणारा व्यवसाय आजमितीस पाचशे मे.ट./प्रती वर्ष इतक्या मोठ्या स्वरुपावर पोहचला आहे. तसेच, कंपनीच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा या विदेशातही रुंदावल्या आहेत. युरो डायरेक्टोरेट ऑफ क्वालिटी मेडिसिन यांची मान्यता या कंपनीला असल्याने त्यांना युरुपात व्यवसाय करण्याची मुभा मिळाली आहे. त्याचप्रमणे, या क्षेत्रातील फारच कमी व्यावसायीकाना मिळणारे थकजॠछझ (जिनिव्हा) याचे प्रमाणपत्र देखील कंपनीला मिळाले आहे. त्यामुळे विदेशात व्यवसाय विस्तार करणे त्यांना सहज शक्य झाले आहे.

 

यशाच्या या शिखरावर पोहचण्याचा प्रवास हा काही साधा सरळ नव्हता. बिपीन शहा यांना हा वटवृक्ष फुलविण्यासाठी अनेकविध समस्यांचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात व्यवसाय वृद्धी साठी बिपीन यांना भांडवल मिळत नव्हते. नवीन कंपनी असल्याने कचा मालासाठी बाजारातून उधारी (क्रेडीट) मिळत नव्हते. त्याचप्रमाणे गुणवत्ता सुधारणे आणि ती कायम राखणे हे एक मोठे आव्हान त्यांच्या समोर होते. तसेच, विदेशात निर्यात करण्यासाठी तेथील देशांच्या गुणवत्तेच्या निकषांवर खरे उतरणे आवश्यक होते. या सर्वासाठी शहा यांना कठोर मेहनत घ्यावी लागली. विदेशातून परवानगी मिळावी यासाठी अडचणीच्या काळातही त्यांनी ७० लाख रुपये त्यासाठी खर्च केले. भारताचे आणि अनुह फार्मा ली. चे नांव विदेशातही चर्चिले जावे यासाठी त्यांनी स्वतः तिथे २० वर्ष विविध प्रदर्शनात सक्रीय सहभाग नोंदविला. भांडवल उभारणीसाठी आणि कर्ज मिळावे यासाठी त्यांनी बँकेच्या अधिकार्‍यांचे मन वळविले. विविध तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी कुशल तांत्रिक वर्ग नेमला त्यात ४ विद्यावाचस्पती आणि १८ औषधनिर्माणशास्त्र मधील लोक यांचा समवेश होता.

 
 
 

कर्मचारी सुखी तर व्यवसाय वृद्धी या धारणेवर शहा यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या कर्मचा-यांना उत्तम पगार ते अदा करता. सुरक्षेकडे प्राधन्य देताना त्यांनी संपूर्ण कार्यालय क्लोज सर्किट केले आहे. सर्व कर्मचार्‍यांचा विमा उतरविण्यात आला असून प्रती वर्षी दसर्याच्या शुभ मुहूर्तावर कर्मचा-यांना बोनस वाटप केला जातो. उद्योग व्यवसाय करत असताना आपण समाजाचेही काही देणे लागतो. याची जाणीव सदैव शहा यंच्या मनी वसलेली असते. त्याच धारणेतून ते सीएसआर या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षाला सुमारेकरोड रुपये सामाजिक दायित्व म्हणून अदा करता. एवढ्या संघर्षमय करायची दखल समाजमन घेणार नाही असे होण शक्य नाही. त्यामुळेच शहा यांना २००२-०३,२००३-०४, २००८-०९, २०११-१२ या वर्षात भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचा उत्तम निर्यातदार हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे ते खर्‍या अर्थाने निर्यातक्षम उद्योजक ठरतात.

- प्रवर देशपांडे

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@