शेअर बाजारावर ‘चीनी’ सावट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2018
Total Views |
 
 
सेन्सेक्स ४६४ निफ्टी १५० अंशांनी घसरला
 
नवी दिल्ली : इन्फोसिस, रिलायन्स, येस बॅंक आदी शेअरमध्ये झालेली घसरण, आठवड्याच्या अखेरीस गुंतवणूकदारांची नफेखोरी याचा परिणाम शुक्रवारी शेअर बाजारावर जाणवला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६४ अंशांनी घसरून ३४ हजार ३१६ अंशांवर बंद झाला तर निफ्टी १५० अंशांनी घसरून १० हजार ३०३ अंशांवर स्थिरावला. अमेरीका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाचे पडसाद आशियाई बाजारांवर उमटत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. चीनची निराशाजनक आर्थिक कामगीरीही याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. अमेरीकेने वाढवलेले व्याजदराचा परिणामही तिथल्या बाजारांवर जाणवला.
  
 
रिलायन्स उद्योग समूहाचे तिमाही निकाल जाहिर झाल्यानंतर रिलायन्सचा शेअर शुक्रवारी ७ टक्क्यांनी घसरला. त्यानंतर ४ टक्क्यांनी सावरत ११०१ रुपयांवर बंद झाला. रिलायन्स समूहाने बुधवारी इतिहासातील सर्वात मोठा तिमाही निकाल नोंदवल्यानंतरही ही घसरण झाली आहे. टेलिकॉम क्षेत्रातील जिओनेही चांगला नफा कमावला आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या दिलेल्या निकालामुळे येस बॅंकेच्या शेअरवरही परिणाम दिसून आला. दिवसअखेर बॅंकेचा शेअर ६ टक्क्यांनी घसरुन २१७.७० रुपयांवर बंद झाला. दोन दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बॅंकेने कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष राणा कपूर यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठीच्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअरची विक्री केली. नॉन बॅंकींग क्षेत्रातील गुंतवूक कंपन्यांचे शेअर सलग दुसऱ्या दिवशी घसरले. कच्च्या तेलाच्या बाजारातील चलन तुटवड्यामुळे ही घसरण होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. डीएचएफएल, इंडिया बुल्स, पीएनबी हाऊसिंग फायनान्स आदी शेअर्समध्ये १७ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली.
  
 
मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्येही घसरण झाली. मिडकॅप इंडेक्स एक, निफ्टी १०० इंडेक्स दीड टक्क्यांनी घसरला. बीएससी स्मॉल कॅपही १.३ टक्क्यांनी घसरला. आयटी, मीडिया, ऑटो, बॅंक, रियल्टीआणि पावर क्षेत्रातील शेअर घसरणीसह बंद झाले. एफएमसीजी क्षेत्रात खरेदी दिसून आली. यासह एचपीसीएल, सन फार्मा, वेदांता, कोटक महिंद्रा, बॅंक, आयटीसी, अदानी पोर्टस्, एचयुएल आदी शेअर वधारले.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@