पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत; मराठीतून साधला संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2018
Total Views |


 


११ हजार लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप


अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत मराठीत संवाद साधला. १८ ऑक्टोंबर २०१८ रोजी साईबाबांच्या समाधीला १०० वर्ष पूर्ण झाल्याने साई संस्थानच्यावतीने गेल्या वर्षभरापासून शताब्दी सोहळा साजरा केला गेला. या शताब्दी सोहळ्याच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी मोदींना आमंत्रित केले होते.

 

११ हजार लाभार्थ्यांना ई गृहप्रवेश

 

पंतप्रधान आवाज योजनेतील दहा लाभार्थ्यांना चाव्या देऊन नरेंद्र मोदी यांनी घरकुल योजनेस प्रारंभ केला. त्यानंतर पंतप्रधान आवाज योजनेतील ११ हजार लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सोलापूर, नागपूर, नंदूरबार, अमरावती, लातूर, ठाणेसह विविध जिल्ह्यातील ११ हजार लाभार्थ्यांना ई गृहप्रवेश देण्यात आला.

 

राज्याला पूर्णपणे मदत करण्याचे आश्वासन

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला पूर्णपणे मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. पंतप्रधान पीक विमा योजने राज्याला लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्य सरकारच्या महत्वाकांशी योजनांना पूर्णपणे मदत करण्याचे देखील त्यांनी आश्वासन दिले.

 

मोदींच्या हस्‍ते साईबाबांची आरती

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते साईबाबांची आरती झाल्यानंतर त्यांच्या हस्ते साईमंदिरात पाद्‍यपूजन सोहळा पार पडला. यावेळी साई संस्‍थानच्‍यावतीने नरेंद्र मोदी यांचा सत्‍कार करण्‍यात आला. त्याचबरोबर शिर्डी साई संस्थानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 

मराठीतून भाषणाची सुरुवात

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच शिर्डीत आले आहेत. यावेळी साईबाबांची आरती व पाद्यपूजन झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. यावेळी ते म्हणाले ''या पवित्र भूमीवरील सर्वांना माझा नमस्कार. साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्ष समारोप सोहळ्या निमित्ताने साईबाबांच्या दर्शन घेण्याचा योग आला. यामुळे आपल्याला आनंद झाला.''

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@