आव्हाडांना काळे फासा; ११ हजारांचे बक्षीस मिळवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2018
Total Views |
 
 

धनगर आरक्षण एकीकरण समितीकडून आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध

 

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी सुप्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांचे एक वक्तव्य चांगलेच भोवण्यालची शक्यता निर्माण झाली आहे. या देशात वाल्याचा वाल्मिकी होतो आणि मल्ल्याचा मल्हारराव होळकर होतो’, असे वादग्रस्त ट्विट आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केले. त्यांचे हे वक्तव्य त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांच्या तोंडाला जो कोणी काळे फासेल त्याला धनगर आरक्षण एकीकरण समितीकडून ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, आव्हाड यांच्याविरोधात सांगली जिल्ह्यातील जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

मल्हारराव होळकरांनी मराठेशाहीचाझेंडा अटकेपार लावून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. एवढेच नव्हे तर होळकरशाहीतील ११ महापराक्रमी शूर वीरांनी तब्बल २२० वर्ष माळवा प्रांतावर राज्य करून राज्यकर्ती जमात म्हणून अखंड हिंदुस्थानवर उमटवला होता. अशा पराक्रमी होळकरराव यांना मल्ल्या असे संबोधण्याचा अधिकार आव्हाड यांना कोणी दिला, असा सवाल धनगर आरक्षण एकीकरण समितीकडून करण्यात आला. तसेच यावेळी त्यांच्या तोंडाळा काळे फासणा-याला ११ हजार १११ रूपयांचे बक्षीस देणार असल्याचेही समितीकडून सांगण्यात आले.

 

आव्हाडांकडून माफी

 

दरम्यान, हे प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसल्यानंतर आव्हाडांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. अजाणतेपणे धनगर समाज बांधवांचे माझ्याकडून भावना दुखावल्याचे सांगत आपण त्यांची माफी मागतो त्यांनी म्हटले आहे.

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 

@@AUTHORINFO_V1@@