दिवाळीत कोकणवासीयांना खास भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2018
Total Views |


 


मुंबई: दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी पाहता कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या साहाय्याने दोन विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रवाश्यांचा प्रवास सुखकर होईल आणि गर्दीचा ताणही कमी होईल. गाडी क्र. ०१०३७/०१०३८ आणि गाडी क्र. ०१०४५/०१०४६ या दोन विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

 

घोषणा केल्यानुसार दि. ५, १२ तसेच १९ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड मार्गावर गाडी क्र. ०१०३७/०१०३८ ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. ही गाडी रात्री १ वाजून १० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल ते त्याच दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी ती सावंतवाडीला पोहचेल. या गाडीचा परतीचा प्रवास त्याच दिवशी म्हणजे दि. ५, १२ व १९ नोव्हेंबर रोजी दु. २ वा. २० मिनिटांनी सावंतवाडीहून सुरु होईल आणि रात्री १२ वा. २० मिनिटांनी तो लोकमान्य टर्मिनस स्थानकावर संपेल. ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबे घेत सावंतवाडीला विसावणार आहे.

 

दुसरी विशेष गाडी ही लोकमान्य ते थिवीम या मार्गावर चालविण्यात येईल. गाडी क्र. ०१०४५/०१०४६ ही गाडी दि. २, ९ व १६ नोव्हेंबर २०१८ रोजी धावणार आहे. ही गाडी २२ एलएचबी डब्यांसह धावणार आहे. वातानुकूलित, स्लीपर तसेच सर्वसाधारण श्रेणीच्या डब्यांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. रात्री १ वा. १० मिनिटांनी ही गाडी लोकमान्य टर्मिनसहून सुटेल तर त्याच दिवशी दु.१.५० मिनिटांनी ती गोव्यात थिवीम स्थानकावर पोहचेल. या गाडीचाही परतीचा प्रवास त्याच दिवशी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी थिवीम स्थानकावरून सुरु होईल तो परत मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर संपेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@