भारतात पहिल्यांदाच 'अशा' कन्येचा जन्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2018
Total Views |


 


पुणे: भारत विज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती करत आहे. याचा साक्षात्कार आज पुण्यात पाहायला मिळाला. गर्भाशय प्रत्यारोपणानंतर पहिल्यांदाच एका महिलेने दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही ऐतिहासिक घटना आज रात्री पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात घडली. डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या टीमने हा इतिहास रचला आहे.

 

१८ मे २०१७ रोजी पुण्यातील गॅलक्सी केअर रुग्णालयातील १७ डॉक्टरांच्या पथकाने भारतातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण केले होते. ही महिला वडोदरा येथे राहणारी असून तिच्या ५२ वर्षाच्या आईने हे गर्भाशय दान केले होते. गेल्या ७ महिन्यांपासून या महिलेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते. जगभरात आतापर्यंत प्रत्यारोपित गर्भाशयातून ११ बाळांचा जन्म झाला आहे. या पद्धतीने जगात येणारे हे १२ वे बाळ आहे.

 

डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी सांगितले की, “गर्भवती महिलेचा रक्तदाब वाढल्याने आम्हाला सिझेरियन करून प्रसूती करावी लागली. या प्रसूतीसाठी लॅप्रोस्कोपी पद्धतीचा वापर करण्यात आला. मुलीचे वजन १.४५० किलोग्रॅम आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून मुलीचा जन्म झाल्याने आम्हाला खूप आनंद होतो आहे.”

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@