'या' नामांकित कंपनीचे दूध भेसळयुक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2018
Total Views |


 

 

मुंबई: ऐन विजयादशमीच्या काळात भेसळयुक्त दूध मुंबईमध्ये येत असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाला मिळाली. ही माहिती कळताच त्यांनी कारवाई करत मदर डेअरी, सारडा (श्रीरंग किसनलाल) , हेरिटेज फूड लि., अग्रवाल मिल्क अशा नामांकित कंपनीचे सुमारे ३.५ लाख लिटर जप्त केले आणि २०,००० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. मुंबईतील मुलुंड चेक नाका, दहिसर नाका, मानखुर्द नाका आणि ऐरोली टोल नाका या सर्व ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.

 

वाशी टोल नाक्यावर केलेल्या तपासणीत हेरिटेज फूड लि. या कंपनीच्या दुधात स्टार्च आणि अमोनियम सल्फेट आढळून आले. त्यामुळे फलटण येथील कंपनीवर छापा टाकल्यानंतर १७ लाख रुपयांची १२०० किलो भेसळयुक्त दूधपावडर आढळून आली. हेरिटेज फूड लि. ही कंपनी फलटण येथे असून कंपनीचे संचालक हैदराबाद येथे राहतात. रामचंद्र साखवलेकर हे या कंपनीचे व्यवस्थापन पाहतात. तुर्भे एमआयडीसीतील प्रभात डेअरीमध्ये मदर्स डेअरीसाठी दूधाचे पॅकिंग केले जाते. त्या दूधात साखरेसारखे भेसळीचे घटक आढळले. तर नाशिकच्या श्रीरंग किसनलाल सारडा यांच्या दूधात स्टार्च आढळले. स्टार्च वापरणे गुन्हा आहे.

 

तपासणीत दुधाच्या पाच ब्रँडचे नमुने कमी दर्जाचे आढळले. त्यामुळे ३ लाख ४४ हजार लिटर दूध जप्त केले तसेच दुधाच्या आठ टँकरमधील दुधात अमोनिआ सल्फेट, शुगर, माल्टोडेक्स्ट्रीन हे घातक पदार्थ आढळले. त्यामुळे हे १९ हजार २५० लिटर दूध नष्ट करण्यात आले. हे दूध ज्या जिल्ह्यातून आले होते, त्या जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना त्या दूध संकलन केंद्रांवर कारवाई सुरु करण्यात आली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@