ब्रॅण्डच्या नावाखाली बनावट शर्टची विक्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2018
Total Views |


 


ठाणे: साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणार एक मुहूर्त म्हणजे दसरा. यावेळी शॉपिंग करण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही. नवीन कपडे घेताना जरा सावधान. कारण कमी प्रतीच्या कपड्याचे शर्ट तयार करून त्यावर ब्रॅण्डच्या शर्टचा लोगो, कागदी रिबन लावून शर्टची विक्री करणाऱ्या भिवंडीतील एका गारमेंट कारखान्यावर भिवंडी गुन्हे शाखेने छापा टाकला. यामध्ये ७ लाख ७५ हजार रुपायांचा ७७६ शर्टसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी भरत हसमुखराय जोशी याला अटक केली आहे.

 

सियाराम सिल्क कंपनीचे ब्रँडेड शर्ट दुय्यम दर्जा असलेल्या कपड्याच्या सहाय्याने तयार करून ते शर्ट ब्रँडेड असल्याचे भासवले जात होते. अशा शर्टची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. ही माहिती मिळताच भिवंडी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत आणि त्यांच्या पथकाने भिवंडीतील श्री अरिहंत कॉम्प्लेक्समधील कारखान्यावर छापा टाकला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@