अरुंधती भट्टाचार्य रिलायन्सच्या संचालकपदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2018
Total Views |
 
 
मुंबई : ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’च्या माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या स्वतंत्र संचाकल पदावर रुजू झाल्या आहेत. कंपनी संचालक मंडळाने ही नियुक्ती केली आहे. ‘रिलायन्स’ समूहाच्या भागधारकांनी मान्यता दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात क्रिस कॅपिटल या इक्विटी फंडाने सल्लागार म्हणून त्यांची निवड केली आहे.
 
६२ वर्षांच्या भट्टाचार्य पाच वर्षे संचालक पदावर राहणार आहेत. औद्योगिक क्षेत्रात गेली ४० वर्षे विवध पदांचा अनुभव असलेल्या अरुंधती भट्टाचार्य सलग चार वर्षे ‘फॉर्च्यून इंडिया’च्या सर्वात प्रभावी उद्योजिकांपैकी एक होत्या. १९७७ साली स्थापन झालेल्या अंबानी समूहाकडून नियुक्त केलेल्या त्या दुसऱ्या संचालक आहेत. रिलायन्सच्या संचालक मंडळावर सध्या निता अंबानी, मुकेश अंबानी आहेत.
 
अरुंधती भट्टाचार्य यांनी २०१३मध्ये ‘एसबीआय’च्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली होती. १९७७सालापासून त्या बॅंकींग क्षेत्रात कार्यरत आहेत. चार दशकांचा अनूभव गाठीशी असलेल्या भट्टाचार्य यांनी ‘एसबीआय’मधील कार्यकाळात बुडीत कर्जे, कर्ज वितरण आदींवर तोडगा काढला होता. त्यांच्या कार्यकाळात जिओच्या सहकार्याने एसबीआयने डिजिटल बॅंकींग आणि इतर वित्तीय सेवा सुरू केल्या होत्या.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@