पुण्यातील सुप्रसिद्ध हॉटेल्स 'अस्वच्छ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018
Total Views |


 


पुणे: पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील तरुणाईचे आकर्षण असलेले वैशाली, सुपली, आणि कॅफे गुडलकसारखे सुप्रसिद्ध हॉटेल्स स्वच्छतेच्या परीक्षेत नापास झाले आहेत. एफडीएने(फूड आणि ड्रग्स विभाग) पाहणी केली असता, या हॉटेल्सचे भटारखाने अत्यंत खराब आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक अवस्थेत असल्याचे उघड झाले.

 

प्रत्येक हॉटेल्समध्ये एफडीएने काही निकष आणि नियम घालून देण्यात आले आहेत. पुण्यातील लोकप्रिय हॉटेल्समध्ये या निकषांची पूर्तता होते का हे तपासण्यासाठी एफडीए अधिकाऱ्यांनी कॅफे गुडलक, वैशाली,रुपाली या हॉटेल्सवर छापे टाकण्यात आले. कॉलेज रोडवर असलेल्या आणि पुण्यातील सर्वात लोकप्रिय असलेले वैशाली हॉटेलच्या किचनमध्ये सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य होते. अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारी भांडीसुद्धा अस्वच्छ असल्याचे निदर्शनात आले. इथे स्वयंपाक करणारे आचाऱ्यांसाठी कोणतीही काळजी घेत नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे एफडीएने दिलेले कोणतेही स्वच्छतेचे सर्टिफीकेट हॉटेलकडे नव्हते.

 

रुपाली आणि कॅफे गुडलक या हॉटेल्समध्ये काही वेगळी परिस्थिती नव्हती. कॅफे गुडलकमध्ये भिंतींवर सर्वत्र कोळ्यांच्या जाळीचे साम्राज्य होते. स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडीसुद्धा व्यवस्थित धुतली गेली नव्हती. अशा सर्व हॉटेल्सना एफडीएने नोटीस दिली आहे. यावर एफडीएच्या सर्व निकषांची पूर्तता करणे अशक्य आहे असे वैशालीचे मालक रंजीत शेट्टींनी म्हटले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@