खुशखबर; महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018
Total Views |



मुंबई : शासकीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये राज्य सरकारने वाढ केली. कर्मचारी महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढला असून यापूर्वी महागाई भत्ता हा १३९ टक्के होता. आता तो ३ टक्क्यांनी वाढून १४२ टक्के होणार आहे. १ जानेवारी २०१८ पासून ही वाढ लागू करण्यात आल्याची माहिती आहे.

 

१ ऑक्टोबर २०१८ पासून या भत्त्याची वाढ रोखीने देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महागाई भत्त्यांमधील वाढ १ जानेवारी २०१८ पासून लागू होणार असली तरी १ जानेवारी ते ३० सप्टेंबरची थकीत महागाई भत्ता हा सध्या देण्यात येणार नसून यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@