श्रीनगरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2018
Total Views |


 


श्रीनगर: श्रीनगर येथील फातेह कादल परिसरामध्ये सैन्यदलाच्या चकमकीत दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या कर्मचाऱ्याला वीरमरण आले. मृत झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एक लष्कर तोयबाचा स्थानिक कमांडर असल्याचेही सांगण्यात येत आहे.

 

फातेह कादल परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. सुरक्षादलाने परिसराला घेराव घालून दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने सैन्यदलाच्या प्रत्युत्तरात दहशतवादी मारले गेले. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला. दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे अधिकारी इम्तियाज इस्माइल परे यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@