काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षांचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |


 

 

फिरोज खान यांच्यावर होते लैंगिक छळाचे आरोप

 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष फिरोज खान यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसापूर्वीच त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील हा खान यांचा राजीनामा मंजूर केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर खान यांच्यावर झालेल्या आरोपाची सखोल चौकशी व्हावी यासाठी काँग्रेसने एक समिती स्थापन केल्याची देखील माहिती समोर येत आहे.


फिरोज खान यांनी २०१७ साली नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली होती. छत्तीसगड येथील रहिवासी असलेल्या महिलेने जून महिन्यात खान यांच्यावर लैंगिंक शोषणाचे आरोप आरोप केले होते. त्याच प्रकरणी गुंजा कपूर या महिलेने राहुल गांधी यांना पत्र लिहून खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे खान यांनी चार महिन्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती समोर येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@