सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 

म्हाडा बांधणार सहा लाख घरे

 
मुंबई : ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना म्हाडा राबवत आहे. या योजनेअंतर्गत म्हाडाची सहा लाख घरे बांधण्यात येणार असून येत्या दोन वर्षात ही घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. विविध उत्पन्न गटांसाठी म्हाडा ही सहा लाख घरे बांधत असून या योजनेचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. राज्यभरात म्हाडाची मालकी असलेल्या भूखंडांवर ही घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईतही म्हाडाच्या मालकीचे अनेक भूखंड आहेत. परंतु यापैकी काही भूखंडांवर झोपड्यांमुळे अतिक्रमण झाल्याने म्हाडासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

ही अतिक्रमणे हटविण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात यावी. अशी विनंती म्हाडाने राज्य सरकारला केली. राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर विशेष अतिक्रमणविरोधी पथकांद्वारे या झोपड्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते. ही अतिक्रमणे हटविल्यानंतरच या भूखंडांचे नेमके क्षेत्रफळ किती? त्यावर एकूण किती घरबांधणी करता येईल. याविषयीचा आराखडा तयार करता येईल. सध्या या भूखंडांवर झोपड्यांमुळे अतिक्रमण झाल्याने त्या भूखंडांच्या क्षेत्रफळाविषयी नेमका अंदाज बांधता येत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@