सलग तिसऱ्या दिवशी बाजार तेजीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |
 

मुंबई  : गुंतवणूकदारांनी भारतीय बाजरपेठेवर दाखवलेला विश्वास, मजबूत झालेला रुपया, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे स्थिरावलेले भाव याचा एकत्रित परिणाम मंगळवारी शेअर बाजारावर जाणवला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९८ अंशांनी वाढून ३५ हजार १६२च्या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७२ अंशांनी वधारून १० हजार ५८५च्या स्तरावर बंद झाला. एनएसईवर नोंदणीकृत शेअर वधारले. रिलायन्स, एसबीआय, आयसीआयसीआय बॅंक आदी शेअर वधारल्याने बाजारात तेजी दिसून आली.

 

दिवसभरात मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये महिंद्रा एण्ड महिंद्रा, अदानी पोर्ट, ओएनजीसी, एसबीआय, आयसीआसीआय बॅंक, येस बॅंक, भारती एअरटेल, टीसीएस, सन फार्मा, आयटीसी आदी शेअर वधारले. एचडीएफसी बॅंक, बजाज ऑटो, मारुति, इन्फोसिस, पावरग्रीड, विप्रो आणि कोटक महिंद्रा बॅंक आदी शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली

 
मंगळवारी रुपयाची सुरुवात हलक्याश्या वाढीने झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया ७३.८१ वर खुला झाला. सोमवारच्या तुलनेत आज चांगली कामगिरी दिसून आली. सोमवारी रुपया २७ पैशांनी घसरला. तोच शुक्रवारी ५६ पैशांनी मजबूत झाला होतासोमवारी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ८० डॉलरवर घसरले होते. मंगळवारी त्यात पुन्हा एका डॉलरने वाढ झालीमंगळवारी स्थानिक गुंतवणूकदारांसह परकीय गुंतवणूकदारांनीही खरेदी केली. स्थानिक गुंतवणूकदारांनी खरेदी २९४.७८ कोटींची गुंतवणूकदारांनी खरेदी केली. परकीय गुंतवणूकदारांनी ६७.८६ कोटींचे शेअर विकले.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@