चला, ‘वाईट हिंदू’ होऊया...!!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |
 

शशी थरूरांनी मात्र आपल्या रोमारोमातले बाबरत्व जागवत अयोध्येत श्रीराम मंदिर नव्हे तर मशीदच हवी, अशी भूमिका घेत स्वतःला बाबराच्या जातकुळीत नेऊन बसवले. पण, अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शेकडो कारसेवकांना स्मरून हिंदूंनी थरूरांच्याच भाषेत बोलायचे तर मंदिराची मागणी करणारेवाईट हिंदूहोऊन ठोस उत्तर दिले पाहिजे, तरच काँग्रेसींच्या मनातला हिंदूद्वेष गायब होऊन ते ताळ्यावर येतील.

 

चांगल्या हिंदूंना अयोध्येत एक धार्मिक स्थळ पाडून त्या जागी श्रीरामाचे मंदिर उभारावेसे वाटत नसल्याचे तारे तोडत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आपल्या मनातल्या बाबराला जागवले. देशभरातील आणि देशाबाहेरील असंख्य हिंदूंचे श्रद्धास्थान म्हणजे प्रभू श्रीराम. श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाल्याचे दाखले हिंदूंच्या पुराणकथांपासून रामलीला लोककथांमध्येही मिळतात. देशात मुस्लीम राजवटीच्या आधीही हिंदू अयोध्येला प्रभू श्रीरामाची जन्मभूमीच मानत होते आणि आजही तोच विश्वास हिंदूंच्या मनात कायम आहे. हा झाला एक भाग-भावभावनांचा. पण, अयोध्येत बाबरी मशिदीच्या ढाच्याखाली पुरातत्त्ववेत्त्यांनी केलेल्या उत्खननातही मंदिराचेच अवशेष सापडले. सध्या भग्नावस्थेत असलेल्या बाबरी मशिदीच्या आधी तिथे मंदिरच होते आणि उभारण्यात आलेली मशीद मंदिराच्याच पायावर बांधण्यात आली होती, हेही समोर आले. बाबरी मशिदीचे आयुष्य फारतर ५०० वर्षांचे-मीर बाँकीने मंदिर तोडून मशीदबांधणी करण्यापासूनचे. म्हणजेच त्याआधी तिथे मंदिर होते, याचीच पुष्टी होते. दुसरीकडे हा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून येत्या २९ ऑक्टोबरपासून जमिनीच्या वादावर अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. शिवाय अयोध्या प्रकरणाशी हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिमांच्याही धार्मिक भावना जोडलेल्या आहेत. आपल्या धर्मश्रद्धांबाबत जास्तच संवेदनशील असलेल्या मुस्लीम कट्टरपंथीयांना आजही अयोध्येत श्रीराम मंदिराऐवजी बाबरी मशिदीचीच पुनर्स्थापना व्हावी असेच वाटते. जरा काही कुठे खुट्ट झाले तर देशातल्या सामाजिक धार्मिक सलोख्याला सुरुंग लागण्यासारखीच ही स्थिती. तरीही काँग्रेससह बुद्धीजीवी वर्तुळात ज्यांच्या विद्वत्तेचे गोडवे गायले जातात त्या शशी थरूरांनी अयोध्या प्रकरणावर तोंड उघडलेच. हिंदूद्वेषाची मळमळ तोंडात घोळवत हिंदूंमध्येच फूट पाडण्याचे काम सुरू केले. कित्येक वर्षांच्या मुस्लीम आणि ब्रिटिश सत्ताधीशांच्या अन्याय-अत्याचाराचा सामना करत आता कुठेतरी एकवटू लागलेल्या हिंदू समाजालाचांगले हिंदूआणिवाईट हिंदूअशा दोन भागांत शशी थरूर यांनी विभागले. अयोध्येत मंदिर नको म्हणणारेचांगले हिंदूआणि मंदिर हवे म्हणणारेवाईट हिंदूअसा शशी थरूर यांच्या मांडणीचा एकूणच आशय होता, ज्याला हिंदूद्रोहच म्हटले पाहिजे. १९४७ साली देशातून ब्रिटिशांचे शासन समाप्त झाले पण त्यांचीफोडा आणि राज्य कराची संकल्पना काँग्रेसने अगदी जशीच्या तशी उचलली. त्याच्याच आधारावर काँग्रेसने इथे ७० वर्षे राज्य केले आणि आता आगामी निवडणुकीत समोर पराभव दिसू लागल्याने पुन्हा एकदा तीच फोडा आणि राज्य कराची नीती शशी थरूरांच्या भाषणांतून पुढे आली. हिंदूंना कोणत्याही एका मुद्द्यावर एकत्र येऊ द्यायचे नाही, हिंदूंमध्ये भेदाची, वेगळेपणाची, अलगतेची भावना निर्माण करायची आणि आपली सत्तेची पोळी भाजायची, हाच काँग्रेसचा डाव असल्याचे यातून स्पष्ट होते. पण अंगावरची पाल झटकावी तसे देशातल्या हिंदू समाजाने काँग्रेसला झटकून-झिडकारून टाकल्याचे २०१४ आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीतून सिद्ध झाले. आताही समाजात विषपेरणी करणारी काँग्रेसची ही खेळी चालण्याची अजिबात शक्यता नाही, उलट अशा पिचक्या डावांमुळे उरल्यासुरल्या काँग्रेसचीही वाट लावण्यावरच देशातला हिंदू समाज शिक्कामोर्तब करेल, हे नक्की.

 

बहुसंख्य हिंदूंच्या भावनांना पायदळी तुडवण्याचे काम काँग्रेसने स्वातंत्र्यापासूनच केले. अगदी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणापासून ही काँग्रेसी परंपरा सुरू होते, ती आजतागायत सुरूच आहे. केवळ मुस्लीम मतांचे गठ्ठेच्या गठ्ठे आपल्या झोळीत पडावेत आणि आपली सत्ता अबाधित राहावी, हा काँग्रेसी राजकारणाचा पोत. मुस्लिमांच्या मनात बहुसंख्येने असलेल्या हिंदूची भीती घालायची, मुस्लिमांच्या भावनांना चुचकारायचे, मुल्ला-मौलवींशी संधान बांधून देशातली सत्ता हस्तगत करायची, पण मुस्लिमांच्या सच्च्या विकासासाठी, त्यांच्यातले दारिद्य्र, बेरोजगारी मिटावी म्हणून काहीच करायचे नाही, हाच काँग्रेसी शिरस्ता. म्हणूनच दिल्लीतल्या जामा मशिदीच्या इमामापासून ते मुस्लीम मोहल्ल्यांतल्या एखाद्या मुल्ला-मौलवींचेही पाय काँग्रेसी नेत्यांनी पकडत जाळीदार गोल टोप्या आपल्या डोईवर घालून घेतल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले. बाबरी मशीद हाही मुस्लिमांसाठी जिव्हाळ्याचाच विषय, जो काँग्रेसला चघळण्यासाठी नेहमीच हवाहवासा वाटतो. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने नमाज पढण्यासाठी मशिदींची अपरिहार्यता नाही, हा निकाल दिला आणि आता अयोध्यावादाचा निकालही हिंदूंच्या बाजूने लागण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर साखरेत मिठाचा खडा पडावा, तसा हिंदूंसाठीच्या आनंदी क्षणात शशी थरूरांच्या रूपाने काँग्रेसी खडा पडला आणि त्यानेअयोध्येत मंदिर नकोची भूमिका मांडली. हा सगळा खेळ चालू झाला तो मुस्लिमांच्या मतांसाठी, पण शशी थरूरांनी जरा आपल्या पक्षाध्यक्षांच्या कृत्यांकडेही लक्ष द्यावे.

 

केवळ मुस्लिमांच्या मतांमुळे आपली डाळ काही शिजणार नाही, हे लक्षात आल्याने राहुल गांधी पाहा कशी पायाला भिंगरी लागल्यासारखे मठ-मंदिरांच्या वार्या करू लागलेत! स्वतःलाजानवेधारी हिंदू ब्राह्मणसंबोधण्यापासून ते काँग्रेसच्या रक्तात ब्राह्मणांचा डीएनए असल्याचे म्हणण्यापर्यंत काँग्रेसींची अगतिकता समोर आली. पण ते सारेच खोटे होते. राहुल गांधींचे हिंदुत्वाचे धोरणही फक्त अंधारात मारलेल्या दगडासारखेच होते. हिंदूंना आपल्याकडे वळवण्यासाठी एकीकडे मठ-मंदिरात घुसायचे आणि दुसरीकडे आपले दाढी कुरवाळू राजकारणही चालू ठेवायचे, अशी ही काँग्रेसी नीती. काँग्रेसच्या याच नीतीची लक्तरे शशी थरूर यांनी देशाच्या वेशीवर टांगली आणि काँग्रेसींच्या हिंदूपणाच्या चेहर्याआड दडलेले हिडीस रूप समोर आणले. कालपरवाच केंद्रीय गृहमंत्रालयाचे माजी अप्पर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनी कमल नाथ या काँग्रेस नेत्याने हिंदू दहशतवादाचे भूत उभे करण्यासाठी कशाप्रकारे दबाव आणला, त्याचे सत्य मांडले. आज शशी थरूर यांनी तीच हिंदूद्वेषाची काँग्रेसी परंपरा जोमाने पुढे नेत हिंदूंच्या आस्थेवर प्रहार केला. खरे म्हणजे मुस्लीम समाजातले बहुसंख्य लोक, शिया मुस्लीम वक्फ बोर्ड आणि त्याचे अध्यक्ष वासिम रिझवी, एवढेच नव्हे तर बाबराचे वंशज असलेल्या प्रिन्स याकूब यांनीही अयोध्येत श्रीरामाचेच मंदिर उभारावे, अशी भूमिका घेतली. ज्या बाबराच्या नावाने श्रीराम मंदिर तोडून बाबरी मशीद उभारली त्याच्याच वंशजाने मंदिरासाठी पहिली सोन्याची वीट मीच रचणार, असे सांगितले. शशी थरूरांनी मात्र आपल्या रोमारोमातले बाबरत्व जागवत अयोध्येत श्रीराम मंदिर नव्हे तर मशीदच हवी, अशी भूमिका घेत स्वतःला बाबराच्या जातकुळीत नेऊन बसवले. पण, अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणार्या शेकडो कारसेवकांना स्मरून हिंदूंनी थरूरांच्याच भाषेत बोलायचे तर मंदिराची मागणी करणारेवाईट हिंदूहोऊन ठोस उत्तर दिले पाहिजे, तरच काँग्रेसींच्या मनातला हिंदूद्वेष गायब होऊन ते ताळ्यावर येतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@