दादर फूल मार्केटमधील हत्येचा उलगडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |

 

 
 
 
मुंबई : काही दिवसांपूर्वी दादर येथील फूलमार्केटमध्ये गोळीबार करून मनोज मौर्या या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी तीन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राधेकृष्णन खुशवाह, राजेंद्र अहिरवाह आणि हेमंत खुशवाह अशी या आरोपींची नावे आहेत. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आली असल्याचे उघड झाले आहे.
 

आरोपी राधेकृष्णन खुशवाह आणि मृत मनोज मौर्या यांची पत्नी हे दिल्लीमधील एका कंपनीत एकत्र काम करत होते. मनोज यांच्या पत्नीशी राधेकृष्णन यांची मैत्री होती. ही मैत्री मनोज यांना मान्य नव्हती. याच कारणामुळे २०१७ साली मनोज मौर्या हे आपल्या कुटंबासह मुंबईत आले होते. तरीदेखील राधेकृष्णन यांनी मनोज यांच्या पत्नीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मनोज आणि राधेकृष्णन यांच्यात अनेकदा वाद झाले होते. राधेकृष्णन यांने राजेंद्र अहिरवाह आणि हेमंत खुशवाह या दोघांना मनोजची हत्या करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती.

 
१२ ऑक्टोबर रोजी दादर फूल मार्केट येथे राजेंद्र आणि हेमंत यांनी मनोज यांची हत्या केली. मनोज यांच्या पत्नीवर राधेकृष्णन यांचे एकतर्फी प्रेम होते. तिला मिळविण्यासाठीच ही हत्या करण्यात आली असल्याचे पोलिंसाचे म्हणणे आहे. दादर फूलमार्केटमध्ये मनोज मौर्या हे डिजिटल वजन काट्यांचा व्यवसाय करत होते. मनोज यांची पत्नीने एमबीएचे शिक्षण घेतले असून ती एका खासगी कंपनीत ती नोकरी करत आहे. दोघांना एक मुलगा आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@