परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |

एनआयआयएफ  आणि  एचडीएफसी अंतर्गत  करार

 

मुंबई : परवडणारी घरांच्या निर्मितीसाठी मंच उपलब्ध व्हावा यादृष्टीने नॅशनल इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड(एनआयआयएफ) आणि एचडीएफसी अंतर्गत करार करण्यात आला आहे. एनआयआयएफतर्फे एचडीएफसीची उपकंपनी असलेल्या एचडीएफसी कॅपिटल अॅडवायझर कंपनीतर्फे चालवल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांसाठीच्या निर्मिती प्रकल्पासाठी (एचकेअर-) ६६० कोटींच्या गुंतवणूकीसाठी करार झाला आहे.

 

एनआयआयएफची भागधारक कंपनी अबुदाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरीटी यात गुंतवणूक करणार असून करारानंतर एनआयआयएफची ही देशातील दुसरी मोठी गुंतवणूक ठरली आहे. एनआयआयएफच्या गुंतवणूकीचा आत्तापर्यंतचा आलेख हा चढता आणि मजबूत आहे. एच-केअर- मधून भारतातील परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी कर्ज दिले जाणार आहे.

 

परडणारी घरे ही देशाची सध्याची गरज असून शहरांच्या निर्मितीसाठी त्यांची आवश्यकता आहे. या करारानुसार देशातील विकसकांना एक संधी उपलब्ध होणार आहे. एनआयआयएफने एचडीएफसीशी केलेल्या कारारामुळे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला वेग येईल, अशी अपेक्षा आहे

 
- सुजॉय बोस, कार्यकारी संचालक अधिकारी, एनआयआयएफ
 

एच-केअर- हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. देशाच्या विकासदरात मध्यम, अल्प उत्पन्न गटातील घरनिर्मितीचाही मोठा वाटा आहे. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर या योजनेत आमचा सहभाग असल्याचा आम्हाला आनंद आहे. या करारातून देशात परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणाऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करुन दिल्यामुळे विकसकांची अडचण कमी होईल.

 
 - दीपक पारेख, अध्यक्ष, एचडीएफसी
 
      
         माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
 
@@AUTHORINFO_V1@@