सीबीआयचा दणका; पळपुट्या घोटाळेबाजाला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |



मोहम्मद याह्या नामक व्यक्तीला वर्षानंतर बेड्या


नवी दिल्ली : देशातील बँकांचे कर्ज घेऊन ते फेडता आल्याने परदेशी पळून जाण्याचे अनेक प्रकार सध्या उघड होत आहेत. मात्र आता एक चांगली बातमी असून, घोटाळे करून परदेशी पळून जाणाऱ्या एका व्यक्तीला सीबीआयने अटक केली आहे. मोहम्मद याह्या असे या घोटाळेबाजाचे नाव आहे. ४६ लाख रुपयाचा घोटाळा करून तो वर्षांपूर्वी भारत सोडून बहारिनला पळाला होता. बहारिन सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने सीबीआयने ही कारवाई केली. मोहम्मद याह्यावर फसवणूक करणे, गुन्हेगारी कट रचणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आदी गुन्हे दाखल आहेत.

 

२००३ मध्ये मोहम्मद याह्या याने अनेक बँकात ४६ लाख रुपयांचा घोटाळा केला होता. याप्रकरणी सीबीआयने २००९ पासून तपास करायला सुरुवात केली होती. मात्र तो पर्यंत मोहम्मद हा देश सोडून पळाला होता. अनेक दिवसांपासून सीबीआय मोहम्मदच्या मागावर होती. भारताबाहेर पळून गेलेल्या घोटाळेबाजांना अटक करण्यासाठी सरकारने फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८ ऑगस्टमध्ये लागू कायदा केला होता. याच कायद्याचा फायदा घेऊन सीबीआयने इंटरपोलच्या मदतीने मोहम्मद राहत असलेल्या बहारिन पोलिसांना रेड कॉर्नर नोटीस पाठवली. त्यानंतर बहारिन पोलिसांनी त्याला अटक करत सीबीआयच्या हवाली केले.

 

मोहम्मद याह्या सध्या बंगलोर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, घोटाळे करून भारताबाहेर पलायन करणाऱ्या अशा एकूण २८ जणांची यादी सीबीआयकडे असून यातील मोठे घोटाळेबाज विजय मल्ल्या निरव मोदी कधी सीबीआयच्या ताब्यात येतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@