सिद्धिदात्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2018
Total Views |



सिद्ध गन्धर्वयशाघैर सुरैररपि ।

सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धि दायनी ॥

 

आई दुर्गाजीच्या नवव्या शक्तीचे नाव ‘सिद्धिदात्री’ होय. या सर्व प्रकारच्या सिद्धी देण्यासाठी ख्यातनाम आहेत. मार्कण्ड पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व व वशित्व अशा प्रकारे आठ सिद्धी होत. ब्रह्मवैवर्त पुराणात भगवान श्रीकृष्णांच्या जन्मखंडात या संख्या १८ दाखविल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे :

 

) अणिमा, २) लधिमा, ३) सराही, ४) प्राकाम्य, ५) महिमा, ६) ईशित्व, वाशित्व, ७) सर्वकामावस्तयिता, ८) सर्वज्ञत्व, ९) परकायप्रवेश, १०) दूरश्रवण, ११) पाकसिद्धी, १२) कृरपवृक्षत्व, १३) सृष्टी, १४) संहारकरण सामर्थ्य, १५) अमरख, १६) सर्वन्यायकत्व, १७) भावना, १८) सिद्धी.

 

आई सिद्धिदात्री भक्त व साधकांना सर्व सिद्धी देण्यास समर्थ आहे. देवी पुराणानुसार, भगवान शंकराने यांच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या. यांच्या अनुकंपामुळे भगवान शंकराचे अर्धे शरीर देवीचे झाले आहे. याच कारणाने ‘अर्धनारिश्वर’ नावाने प्रसिद्ध आहे. आई सिद्धिदात्री यांना चार हात असून यांचे वाहन सिंह आहे. या कमळाच्या फुलावर आसनस्थ असतात. यांच्या उजव्या बाजूच्या खालील हातात चक्र असून वरील हातात गदा आहे. डाव्या बाजूच्या खालील हातात शंख असून वरील हातात कमलपुष्प आहे. नवरात्रपूजेच्या नवव्या दिवशी यांची उपासना करतात. या दिवशी शास्त्रीय विधी विधानपूर्वक, पूर्ण अंत:करणापासून, निष्ठापूर्वक साधना करणार्‍या साधकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात. सृष्टीत काहीही अशक्य नाही, ब्रह्मांडावर पूर्ण विजय प्राप्त करण्यास साधकामध्ये सामर्थ्य येते. प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य हे आहे की, त्याने आई सिद्धिदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी निंरतर प्रयत्न केले पाहिजे. त्यांच्या आराधनेत-प्रार्थनेत कुठलाही कसूर बाकी नको. यांच्या कृपेने अनंत दु:खरुप संसारात निर्लिप्त राहून सगळ्या सुखांचा मोक्ष प्राप्त करु शकतो.

 

नऊ दुर्गांमध्ये आई सिद्धिदात्री अंतिम होय. अन्य आठ दुर्गाजींच्या पूजा-उपासना शास्त्रीय विधी विधानानुसार भक्त दुर्गापूजेच्या नवव्या दिवशी यांच्या उपासनेत प्रवृत्त होतो. आई सिद्धिदात्री यांची उपासना संपूर्ण करण्याकरिता भक्ताच्या व साधकांच्या लौकिक परलौकिक सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होऊन जातात. परंतु, आई सिद्धिदात्रीच्या कृपेने भक्ताच्या अंत:करणात कोणती इच्छा आकांक्षा शिल्लक राहात नाही. त्यांची भक्तावर कृपा झाली की सांसारिक इच्छा, आवश्यकता आणि स्पृहासे वरील मार्गात जाऊन मानसिक रुपाने आई भगवतीच्या दिव्य लोकांत विचरण करतात. त्यांच्या कृपारसाने सदोदित स्वाद घेऊन विषयभोग शून्य होऊन जाते. आई भगवतीच्या सदैव सान्निध्यात सर्वस्व मिळून जाते, परमपद अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपणांस नियमानुसार अन्य कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. आईच्या चरणकमळाजवळ सदैव सान्निध्यात राहण्यासाठी आपणास निरंतर नियम पाळून त्याची उपासना केली पाहिजे. आई भगवतीचे स्मरण, पूजन करुन आम्हाला संसारातील जाणीव करुन परमशांतीदायक अमृत पदापर्यंत घेऊन जाते.

 

- पुरुषोत्तम काळे

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@