दारू घरपोच देण्याचा निर्णय नाहीच : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
 
मुंबई : घरपोच दारू पोहोचविण्याचा कोणताही विचार राज्य सरकार करत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. "असा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही आणि घेणारदेखील नाही." अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
 

ड्रंक अँड ड्राइव्हमुळे होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी घरपोच दारू देण्याच्या प्रस्तावावर विचार होत असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तसंस्थेला दिली होती. परंतु असा कोणताही प्रस्ताव मंजूर केला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

 
वाचा संबंधित बातमी : आता दारूही घरपोच मिळणार? 
 
 
घरपोच दारू देण्याच्या प्रस्तावामुळे समाजात चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळे मद्यपानास प्रोत्साहन मिळून अवैध दारू पुरवठा होण्याचे प्रमाण वाढेल. अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रातून उमटत होत्या. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली याबाबत भूमिका स्पष्ट केल्यामुळे अनेक प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@